नगर-कल्याण रोडवरील घटना;बसची मोटारसायकलला जोरदार धडक, 3 ठार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 8, 2023

नगर-कल्याण रोडवरील घटना;बसची मोटारसायकलला जोरदार धडक, 3 ठार..

 नगर-कल्याण रोडवरील घटना; बसची मोटारसायकलला जोरदार धडक, 3 ठार..


अहमदनगर -
नगर-कल्याण महामार्गावरील वडगाव आनंद गावच्याशिवारात टेम्पो ट्रॅव्हल्स बसने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील तिघे जागीच ठार झाले आहे.अपघातातील मृतांची नावे योगेश रामकुमार (वय 21), चाहात बाबुराव (वय 17), संजीव कुमार (वय 24) सर्व राहणार उत्तरप्रदेश, परप्रांतीय आहेत.
उत्तरप्रदेश, येथील परप्रांतीय तीन मृत तरुण आपल्या उदरनिर्वाहासाठी आळेफाटा येथे असलेल्या एका खाजगी बेकरीत मजूर म्हनुन काम करत होते. बुधवारी रात्री कल्याण रोडवर एकाच मोटारसायकलवर जेवण करण्यासाठी गेले होते.
वडगाव आनंद गावच्याशिवारात चौगुलेवस्तीजवळ रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना विरुद्ध दिशेने आलेलेया टेम्पो ट्रॅव्हल्स बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मोटारसायकल वरील तीन परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्य झाला आहे. बेकरीमध्ये मजुरी काम करत असलेल्या तिघा मायातांमध्ये एका अल्पवयीन मजुराचा समावेश आहे.


No comments:

Post a Comment