खाजगी रुग्णालयात रुग्ण हक्कांची सनद लावा; अन्यथा परवाना रद्द. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 14, 2023

खाजगी रुग्णालयात रुग्ण हक्कांची सनद लावा; अन्यथा परवाना रद्द.

 खाजगी रुग्णालयात रुग्ण हक्कांची सनद लावा; अन्यथा परवाना रद्द.

जिल्हा शल्यचिकित्सक यांचे आदेश.


अहमदनगर :
कोरोना कालावधीत रुग्णांची झालेली आर्थिक फसवणूक लक्षात घेऊन केंद्र सरकार व मानव अधिकार आयोगाने रुग्ण हक्कांची सनद लावण्याचे आदेश दिले होते. यानंतर ही अहमदनगर जिल्हृयातील बहुतांश खाजगी रुग्णालये रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती दर्शणी भागात लावत नव्हते. या मुळे रुग्ण हक्कांचे उल्लंघन होत होते, या विषयाला वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे 09 फेब्रुवारी 23 ला तक्रार दाखल केली होती. 
तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने या विषयी तात्काळ कार्यवाही करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांना सुचित केले. या सुचनेवरुण जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जा. क्र.जि.रु.ऊ/बॉम्बे नर्सिंग होम /10286-89/23 दि.02 जून रोजी हे पत्र निर्गमित केले. 
यामध्ये म्हटले की,जिल्हृयातील सर्व खाजगी रुग्णालय चालकांना सुचित करण्यात येते की , आपणास वारंवार सुचना देऊन ही आपण रुग्ण हक्कांची सनद व दर पत्रक ची माहिती दर्शणी भागात लावलेली दिसून येत नाही.सदरील माहिती दर्शणी भागात लावून तसा अहवाल कार्यालयास तात्काळ कळविण्यात यावा. आपण लावण्यात आलेली रुग्ण हक्कांची सनद व दर पत्रक दर्शणी भागात लावलेले फोटो सोबत जोडण्यात यावेत अन्यथा आपल्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात येईल याची दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिले.

No comments:

Post a Comment