उत्तरखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांची श्री विशाल गणेश मंदिरास भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 14, 2023

उत्तरखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांची श्री विशाल गणेश मंदिरास भेट

 उत्तरखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांची श्री विशाल गणेश मंदिरास भेट.

देशातील देवस्थाने ही आपली शक्तीस्थाने - माजी मुख्यमंत्री तिरथसिंग रावत.


नगर - 
उत्तराखंड ही देवभुमी म्हणून तर महाराष्ट्र ही संतांची भुमी म्हणून ओळखले जाते. भारतातील प्रत्येक देवस्थान ही आपली शक्तीस्थाने आहेत. या शक्तीस्थांनाचा विकास होण्यासाठी केंद्रातील भाजपप्रणित सरकारने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या माध्यमातून देवस्थानांचा सर्वांगिण विकास होत आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शनी शिंगणापुर ही जगविख्यात देवस्थान आहेत. तसेच नगर शहराचे ग्रामदैवत असलेले श्री विशाल गणेश मंदिराची प्रचितीही सर्वदूर पोहचली आहे. येथील श्री विशाल गणेशाची मुर्ती प्रेरणादायी आहे. या मंदिराचा सुबक व देखण्या विकासामुळे मंदिराच्या वैभवात भर पडत आहे. या ठिकाणी आल्याने मोठे समाधान लाभले आहे, असे प्रतिपादन उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार तिरथसिंग रावत  यांनी केले.

शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार तिरथसिंग रावत व मध्य प्रदेशचे पर्यटन विभाग अध्यक्ष विनोद गोटिया यांनी भेट दिली असता त्यांचा देवस्थानच्यावतीने सत्कार करतांना अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहराध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अभियानप्रमुख शशांक कुलकर्णी, सचिन पारखी, बाबासाहेब सानप, दिलीप भालसिंग, राजेंद्र सातपुते, अमित गटणे, करण भळगट आदि उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड.अभय आगरकर यांनी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश हा नवसाला पावणारा असल्याने अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मंदिराचा होत असलेला विकासामुळे मंदिराच्या लौकिकात भर पडत आहे. त्यामुळे देशभरातून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत आहे. आजचे यजमान तिरथसिंग रावत यांनी उत्तरखंडचे मुख्यमंत्री असतांना देवस्थानाच्या विकासास चालना दिली आहे, असे सांगून मान्यवरांना देवस्थान विषयी माहिती दिली.

याप्रसंगी विनोद गोटिया यांनी देशातील देवस्थानाचा समन्वय साधून त्या देवस्थानची महती सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम होणे गरजेचे आहे. त्यामुळे देवस्थानाचा विकासाबरोबरच पर्यटनासही चालना मिळेल, असे सांगून नगरची श्री विशाल गणेश मंदिरातील मुर्ती  नावाप्रमाणेच विशाल असून, दर्शनाने धन्य झालो, असे सांगितले.

No comments:

Post a Comment