शनिशिंगणापूरचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांची कार टेम्पोला धडकली, 4 ठार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 12, 2023

शनिशिंगणापूरचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांची कार टेम्पोला धडकली, 4 ठार.

 शनिशिंगणापूरचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांची कार टेम्पोला धडकली, 4 ठार.


शनिशिंगणापूर येथून देवदर्शन करून निघालेल्या भाविकांची भरधाव कार दुभाजकाला धडकून दुसऱ्या लेनवरून जाणाऱ्या आयशर टेम्पोला धडकली. यात कारमधील चार जण ठार झाले, तर एक महिला गंभीर जखमी झाली. छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील वडाळा बहिराेबा (ता. नेवासे) गावाजवळ रविवारी ११ वाजता हा अपघात झाला.

मृतांमध्ये तीन जण मध्य प्रदेशचे, तर एक नेवासे तालुक्यातील आहे. राहुल परमेश्वर शर्मा (२८, रा. सी-१४ कलंदी, गोल्ड सिटी, इंदूर), हर्षित मनोहरलाल शर्मा (१८, रा. ए-१, हिंमतनगर, रतलाम, मध्य प्रदेश), योगेश परमेश्वर शर्मा (२१, रा. कुंडली, मध्य प्रदेश), अविनाश मंडलेचा (रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासे) अशी मृतांची नावे आहेत.

लक्ष्मी हिवरा येथील अविनाश मंडलेचा मित्रांसह शनिशिंगणापूरला गेले होते. तेथे दर्शन घेऊन देवगड येथे दर्शनासाठी जात होते. वडाळा बहिरोबाजवळ त्यांची कार दुभाजकास धडकून दुसऱ्या लेनवर आली व आयशर टेम्पोला धडकली. इंदूर येथील मृत बँकिंग क्षेत्राशी संबंधित असून मंडलेचा हे सीए होते.

No comments:

Post a Comment