अर्धवट अवस्थेतील रस्त्याचे काम तातडीने सुरू करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 10, 2023

अर्धवट अवस्थेतील रस्त्याचे काम तातडीने सुरू करा.

 अर्धवट अवस्थेतील रस्त्याचे काम तातडीने सुरू करा.

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन.


अहमदनगर -
नगर तालुक्यातील मौजे निमगाव वाघा ते जाधव मळा वस्ती येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तीन वर्षापासून मंजूर असणाऱ्या अर्धवट अवस्थेतील रस्त्याचे काम तातडीने सुरू करून ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत नगर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत बोडखे, सचिन जाधव, शहानवाज शेख, नवनाथ हारदे, समर्थ शिंदे, सुरेश कसाब, अमित गांधी, दीपक गुगळे, गौतमी भिंगारदिवे, रोहिणी पवार आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, निमगाव वाघा ते जाधव मळा वस्ती येथील 800 मीटर डांबरीकरणासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मागील ३ वर्षांपूर्वी ३७.२७ लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला होता. व सदर रस्त्याचे काम ३० ते ४० टक्के एवढेच झालेले आहे. त्यातही केलेल्या कामात अनेक ठिकाणी पडलेले खड्डे बुजून बीबीएम पूर्ण करून त्यावर अंतिम डांबरीकरण करण्याची अंतिम लेयर मारणे बाकी असून,सदर रस्त्याचे काम हे अर्धवट आहे,परंतु त्यास ठेकेदार जबाबदार तर आहेच,त्याहीपेक्षा जास्त भ्रष्ट शासकीय अधिकारी, अभियंते जबाबदार आहेत.परिणामी रस्ते कमी वेळेत खराब होणे किंवा रस्ता पूर्ण करण्याआधी ठेकेदारास कामाचे बिल अदा करणे या घटना घडतात आणि याचा थेट परिणाम हा रस्त्याच्या गुणवत्तेवर होऊन सर्वसामान्यांचा पैसा जो टॅक्स च्या स्वरूपात प्रशासनाकडे असतो तो काम व्यवस्थित किंवा पूर्ण न होताच भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या/ ठेकेदारांच्या खिशात जातो.
काम चुकार ठेकेदारांना काम वेळेत न केल्यास त्यांनी भरलेल्या डिपॉझिट जप्त करून त्यांना शासनाच्या काळया यादीत समाविष्ट करून कायमस्वरूपी यापुढे टेंडर भरण्यास मज्जाव केला जाऊ शकतो असो या रस्ता संदर्भात आपल्या विभागाने तर सर्व नियम पाडळी तुडवत भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आज तीन वर्षे होऊनही काम पूर्ण करून घेण्यास असमर्थ आहात हे यातूनही स्पष्ट होत आहे या नंतर येणाऱ्या ७ दिवसात या रस्त्याचे काम सुरू न केल्यास जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने कार्यालयातील अधिकाऱ्यांना काळे फासून आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment