धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 12, 2023

धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या.

 धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या.


किरकटवाडी सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्या जवळील गोसावी वस्ती समोर एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह कालव्याजवळील झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल चंद्रकांत आटोळे ( वय 36 रा. गोसावी वस्ती नांदेड ता. हवेली) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हत्तेचे कारण अस्पष्ट आहे.

आज सकाळी सिंहगड रस्त्यावरील सिल्वर बर्च हॉस्पिटल च्या समोर कालव्यालगत असलेल्या झुडपामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. याबाबत हवेली पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन वांगडे , पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस हवालदार अशोक तारू, पोलीस नाईक संतोष भापकर, राजेंद्र मुंडे, प्रवीण ताकवणे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हत्या झालेल्या राहुल आटोळे याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खोल जखमा आहेत. राहुलचा पेरू विक्री करण्याचा व्यवसाय करत होता. त्याची हत्या नेमकी कोणी व कोणत्या कारणाने केली हे अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत हवेली पोलीस अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment