कारची-दुचाकीला धडक; दुचाकीवरील दोघे जागीच ठार, दोन जखमी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 2, 2023

कारची-दुचाकीला धडक; दुचाकीवरील दोघे जागीच ठार, दोन जखमी.

 कारची-दुचाकीला धडक; दुचाकीवरील दोघे जागीच ठार, दोन जखमी.


मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील नागोली-नागठाणा फाट्याजवळ एका वाहनाच्या धडकेत 2 जण जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री 10.30 वाजता घडली. ज्ञानेश्वर बला पवार वय 40 रा. शिंगणापूर, कुंदन दारासिंग पवार वय 35 रा. चिंचखेड व मिनी गणपत सोळंके वय 17 रा. खांदला हे तिघे जण मूर्तिजापूरकडे येत असताना पाठीमागून येणार्‍या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात कुंदन दारासिंग पवार व मिनी गणपत सोळंके हे दोघे घटनास्थळीच ठार झाले. तर ज्ञानेश्वर बला पवार गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच गजानन महाराज आपत्कालीन पथक घटनास्थळावर दाखल होऊन रुग्णसेवक सुनील लछुवानी, सेनापती शेवतकर, जितू पवार, अमोल खंडारे, गौरव जाधव, बादशाह यांनी अपघातग्रस्तांना उपचारासाठी स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातातील एका गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले. अधिक तपास ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

No comments:

Post a Comment