घरमालकाच्या मुलाचा 2 विद्यार्थ्यांवर चाकुने हल्ला; चाकूने वार केल्यानंतर खोलीमध्येच डांबून ठेवले.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 2, 2023

घरमालकाच्या मुलाचा 2 विद्यार्थ्यांवर चाकुने हल्ला; चाकूने वार केल्यानंतर खोलीमध्येच डांबून ठेवले..

 घरमालकाच्या मुलाचा 2 विद्यार्थ्यांवर चाकुने हल्ला; चाकूने वार केल्यानंतर खोलीमध्येच डांबून ठेवले..


छत्रपती संभाजीनगर -
किरकोळ वादातून घरमालकाच्या मुलाने दोन भाडेकरू विद्यार्थ्यांवर धारदार चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री सिडको पोलिस ठाणे हद्दीतील पवननगरमध्ये घडली. हल्ला केल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतील या दोघांना मदत न करता आरोपीने त्यांना खोलीत डांबून ठेवले. या घटनेत प्रमोद पंढरीनाथ गायकवाड (17) आणि निवृत्ती कडुबा कावळे (17) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी प्रमोदची प्रकृती गंभीर आहे. तर निवृत्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.
ही घटना घडून 24 तासांचा अवधी उलटला तरीही सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ही बाब पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांना कारवाई करण्याची सूचना केली. शहरातील धार्मिक कार्यक्रमातील बंदोबस्तात पोलिस व्यग्र असल्याने शिवाय तक्रारदारही ठाण्यात न आल्याने गुन्हा नोंदवण्यास उशीर झाल्याची माहिती नांदेडकर यांनी दिली.
घरमालकाने मुलांना रूमचा दरवाजा बंद करायला सांगितले. मात्र, त्यांनी तो लगेच बंद केला नाही. आमचा स्वयंपाक सुरू आहे. तो झाल्यानंतर आम्ही दरवाजा बंद करतो, असे उत्तर त्यांनी दिले. मात्र, यातून शब्दाला शब्द लागत गेला आणि वाद वाढला. त्यामुळे चिडलेल्या घरमालकाने चाकूहल्ला केला.

No comments:

Post a Comment