नगरसेवक शाम नळकांडे यांच्या प्रयत्नाने नागरिकांना आयुष्यमान कार्डचे वितरण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 19, 2023

नगरसेवक शाम नळकांडे यांच्या प्रयत्नाने नागरिकांना आयुष्यमान कार्डचे वितरण.

 नगरसेवक शाम नळकांडे यांच्या प्रयत्नाने नागरिकांना आयुष्यमान कार्डचे वितरण.

आयुष्यमान भारत कार्डचे जास्तीत जास्त नागरिकांना वितरण करण्याचा प्रयत्न - महापौर रोहिणी शेंडगे.


नगर -
आयुष्यमान भारत कार्डमुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित होत आहे.  या कार्डच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा मिळणार असल्याने नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. शासनाच्या योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. जेणे करुन सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम मनपाच्या माध्यमातून सुरु आहेत. त्यासाठी आरोग्य केंद्रातही अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहे. आयुष्यमान भारत कार्डचे नगरमधील जास्तीत जास्त नागरिकांना वितरण करण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांनीही या कार्डसाठी आपल्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन  महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
कल्याण रोड येथे नगरसेवक शाम नळकांडे यांच्या प्रयत्नाने प्रभागातील नागरिकांना आयुष्यमान कार्डचे वितरण महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शाम नळकांडे म्हणाले, विकास कामांबरोबर लोकांच्या वैयक्तिक प्रश्नांसाठी आम्ही नेहमीच कार्यरत राहिलो आहे. आयुष्यमान भारत कार्डचे प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांना वितरण करण्यात येत आहे. त्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ प्रभागातील जास्तीत जास्त मिळवून देण्यात येत आहे. प्रभागातील अनेक मुलभूत प्रश्न मार्गी लागले आहेत. यापुढील काळात उर्वरित प्रश्नही मार्गी लागतील.  असेही श्री.नळकांडे यांनी सांगितले.
याप्रसंगी संजय शेंडगे, सचिन शिंदे यांनीही मनोगतातून प्रभागातील नागरिकांना सर्वोतोपरि सुविधा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. प्रास्तविकात डॉ.आरती ढापसे यांनी आयुष्यमान भारत कार्ड विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन सुशांत शिंदे यांनी केले तर आभार भैय्या गडाख यांनी मानले.
याप्रसंगी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, तोफखाना आरोग्य केंद्रप्रमुख डॉ.आरती ढापसे, सुशांत शिंदे, भैय्या गडाख, राहुल देवनपल्ली, गौरव क्षीरसागर, पांडूरंग मोरे, बाबू शिंदे, रुपेश लोखंडे, योगेश चौधरी, रोहिणी सानप, कविता लाहोर, ज्योती भोर, शुभांगी लोखंडे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment