बहिरोबावाडी येथील बहुप्रतिक्षित बीएसएनएल मनोरा उभारणीच्या कामाला सुरुवात ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 17, 2023

बहिरोबावाडी येथील बहुप्रतिक्षित बीएसएनएल मनोरा उभारणीच्या कामाला सुरुवात !

 बहिरोबावाडी येथील बहुप्रतिक्षित बीएसएनएल मनोरा उभारणीच्या कामाला सुरुवात !


पारनेर -
तालुक्यातील बहिरोबावाडी येथे शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे व पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेशजी लंके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर झालेल्या बीएसएनएल कंपनीच्या  4 जी मनोऱ्याच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ शनिवारी शेतकरी नेते अनिल देठे पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.
गेली अनेक वर्षांपासून बहिरोबावाडी गावातील नागरिक दुरसंचारसेवेपासुन वंचित होते शेजारील किन्ही गावातील बीएसएनएल मनोऱ्याची दुरसंचारसेवा नेहमीच कमी अधिक प्रमाणात मिळत असल्याने व अनेकदा मनोरा वेगवेगळ्या कारणास्तव बंद राहत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती या पार्श्वभूमीवर  शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी नगर दक्षिणचे माजी खासदार स्व.दिलीपजी गांधी यांच्यापासून पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेशजी लंके यांच्यापर्यंत अनेकदा सातत्याने बीएसएनएल चा स्वतंत्र मनोरा मंजुर करण्यासाठी पाठपुरावा केला अखेर मागीलवर्षी आ.निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून बहिरोबावाडी येथे स्वतंत्र बीएसएनएल कंपनीचा 4 जीचा मनोरा मंजुर झाला त्यासाठी किन्ही ग्रामपंचायतच्या मालकीची दोन गुंठे जागाही उपलब्ध करून देण्यात आली व शनिवारी या मनोऱ्याच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ शेतकरी नेते अनिल देठे पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.या वेळी व्हा.चेअरमन शंकर व्यवहारे , बापुशेठ देठे , संचालक सखाराम खोडदे , अश्विनी व्यवहारे , बाळासाहेब शिंदे ,लक्ष्मण व्यवहारे , अशोक किनकर , रामदास देठे, विष्णू खरात , स्वप्निल शेळके , साईनाथ व्यवहारे , रावसाहेब व्यवहारे , संगिता व्यवहारे , सुनिता व्यवहारे , स्वप्नाली शिंदे आदी उपस्थित होते.


बीएसएनएल चा मनोरा मंजुर झाल्याने एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न सुटल्याचे आत्मिक समाधान लाभले. बहिरोबावाडी गावातील नागरिकांना गेली अनेक वर्षांपासून समाधानकारक व पुर्ण क्षमतेने दुरसंचारसेवेचा लाभ मिळत नव्हता त्यामुळे अनेकदा आंदोलने करावी लागत असे, सध्याचे युग हे माहिती तंञज्ञानाचे युग असल्याने दुरसंचारसेवा हि प्रत्येकाच्या जिवनातील अविभाज्य घटक बनलेली आहे त्यामुळे या प्रश्नावर मी सातत्याने आवाज उठवत राहिलो तसेच माजी खासदार स्व.दिलीप गांधी व आमदार निलेशजी लंके यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर यश प्राप्त झाल्याचे व एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे आत्मिक समाधान लाभले. - अनिल देठे पाटील, शेतकरी नेते.

No comments:

Post a Comment