सेनापती बापट मल्टी स्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीचा बळीराजा साठी अनोखा उपक्रम ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 24, 2023

सेनापती बापट मल्टी स्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीचा बळीराजा साठी अनोखा उपक्रम !

सेनापती बापट मल्टी स्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीचा बळीराजा साठी अनोखा उपक्रम !
"सेनापती बापट कृषी संजिवनी अर्थसहाय्य कर्ज योजने " अंतर्गत करनार सुलभ वित्तसहाय्य !
पारनेर -  सेनापती बापट मल्टी स्टेट को-ऑप क्रेडीट सो.लि.पारनेर संचालित पारनेर तालुक्यातील शेतक-यांसाठी जैवीक, रासायनिक सर्व प्रकारची खते व सर्व बि-बियाणे खरेदीसाठी "सेनापती बापट कृषी संजिवनी अर्थसहाय्य कर्ज योजना"
जय जवान जय किसान म्हणुन आपण शेतक-यांना गौरवितो पण आपण शेतक-यांच्या जीवनाच्या आडचणीचा कधी विचार करत नाही . आपल्या या मातृभुमीसाठी देशासाठी धान्य पिकवणारा सुजलाम सुफलाम धरती बनवणास हा शेतकरी स्वतःच्या पोटाचे खळगे भरण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबतो . परंतु दोन वेळचे अन्न ही त्याच्या वाट्याला येत नाही, ऐशो आरामाचे जिवनही तो जगु शकत नाही . शेतकरी म्हणजे जो माणुस जो उण - पाऊस, थंडी वाऱ्याची चिंता न करता आपल्या कष्टाने आपल्या शेतात पिके वाढवण्याची काम करतो आपल्या मेहनतीने तो शेतात विविध प्रकारचे धान्य फळे भाजीपाला पिकवतो आणि बाजारपेठात वाजवी भावत विकतो . शेतक-यांच्या कष्टाने पिकविलेल्या या खाद्य पदार्थ आणि भाजीपाला देशातील प्रत्येक व्यक्ती आपले अन्न म्हणुन वापरतो . पण आपल्याला जानीव नसेल पन शेतक-यांचे जीवन अनेक समस्यांचे कष्टाने भरलेले आहे. विविध पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात मेहनत घेतात.
परंतु शेतक-यांकडे प्रतिक्षा क्षमतेचा अभाव असतो. कारण शेतक-याने एकदा पिक पेरल्यानंतर ते पिक यायला व त्याची विक्री होऊन त्याचे उत्पन्न हातात यायला काही काळ निघुन जातो . या काळात शेतक-यांच्या आर्थिक गरजा या निर्माण होणा-या असतात म्हणून त्याला कर्जाची आवश्यकता असते. 
         त्याच प्रमाणे शेती करण्यासाठी त्याला विविध प्रकारच्या खर्च करावा लागतो, शेतीची जी विविध कामे आहेत, मजुराची मजुरी देणे, शेतीसाठी अवजारे खरेदी करणे , शेतीची मशागत करण बि-बियाने रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करणे यासाठी शेतक-याला कर्जाची आवश्यकता आसते . वेळेवर शेतक-याला पुरेसे कर्ज मिळत नाही.
आणि त्यामुळे तो शेतामध्ये भांडवल टाकु शकत नाही. अधुनिक पध्दतीने शेती करू शकत नाही.
       याचा परिणाम त्याच्या उत्पादकतेवर होती.
म्हणून शेतक-याला आर्थिक पाठबळ मिळविण्यासाठी त्याला वेळेवर कर्ज पुरवठा करण्यात आला तर ती वेळेवर शेतीमध्ये भांडवल गुंतवु शकेल , शेतीचा विकास करू शकेल ? त्यासाठी शेतक-यांना वेळेवर व पुरेसे कर्ज पुरविण्यासाठी आपल्या पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या शेतक-याच्या , कष्टक-यांच्या मनगटाला बळकटी मिळावी म्हणून आम्ही शेतक-यासाठी
सेनापती बापट कृषी संजिवणी अर्थ सहाया कर्ज योजना राबवत आहोत . जर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्याच्या हातात उत्पन्न पुरेसे येईल त्याचे दारिद्र दूर होईल, त्याच्या उत्पादनात स्वयत्तता निर्माण होईल आणि त्यामुळे शेतक-यांच्या मनात आत्महत्येचा विचार सुध्दा येणार नाही.
       या उदात्त हेतुने सेनापती बापट मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सो. लि . पारनेर या संस्थेने शेतक-यांसाठी बि-बियाणे व सर्व प्रकारची खते खरेदीसाठी या योजनेअंतर्गत रुपये ५०,०००/- ( अक्षरी रुपये पन्नास हजार ) मात्र तातडीने अमुदत कर्ज योजना करण्यात आली असून त्याची त्वरीत अमंलबजावणी करण्यात येत आहे. त्या साठी सर्वाधिक शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेवा असे आवाहन संस्थेचे चेअरमन रामदास भोसले यांनी समस्त शेतकरी बांधवांना केले आहे.

No comments:

Post a Comment