नोटा बदलून देण्याचे आमिष, 6 लाखांना गंडा; आरोपींत पोलिसाचाही समावेश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, June 4, 2023

नोटा बदलून देण्याचे आमिष, 6 लाखांना गंडा; आरोपींत पोलिसाचाही समावेश.

 नोटा बदलून देण्याचे आमिष, 6 लाखांना गंडा; आरोपींत पोलिसाचाही समावेश.


दोन हजाराच्या नोटा बदलून देण्याच्या आमिषाने चौघांच्या टोळीने कर्नाटकातील मंगसुळी येथे बोलावून घेत सावर्डे (ता. तासगाव) येथील समीर भानुदास भोसले यांना सहा लाखांचा गंडा घातला.

खंडोबा देवस्थान परिसरात मोटारीत पैसे घेतल्यानंतर पोलिस आल्याची बतावणी करत भोसले यांना पळवून लावले. या टोळीत सांगली पोलिस दलातील शिपाई सागर जाधव याचा समावेश असून, कागवाड पोलिसांनी त्याच्यासह तिघांना अटक केली. तर मुख्य सुत्रधार फरारी आहे. या प्रकरणामध्ये सांगली पोलिस दलात कार्यरत सागर जाधव (रा. कवठेमहांकाळ) या पोलिस शिपायाच्या सहभागामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचे प्रकरणही उजेडात आले आहे. आता दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून फसवण्याचेही प्रकारही वाढीस लागले आहेत. कुठल्याही अज्ञात व्यक्तीवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

तिघांवर गुन्हा दाखल जाधव मिरज शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्याची तासगाव पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. मात्र बदलीच्या ठिकाणी तो हजर झाला नव्हता. गुरुवारी तो मंगसुळीतील फसवणूक प्रकरणात सापडल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी सांगलीचे पोलिस प्रमुख डॉ.बसवराज तेली यांना घटनेची माहिती दिली. डॉ.तेली यांनी रीतसर कारवाईच्या सूचना दिल्यानंतर जाधवसह तिघांवरही गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment