स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दरोडाच्या तयारीत असणारे 3 दरोडेखोर जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 1, 2023

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दरोडाच्या तयारीत असणारे 3 दरोडेखोर जेरबंद.

 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दरोडाच्या तयारीत असणारे 3 दरोडेखोर जेरबंद.


अहमदनगर -
तपोवन रोडवरील भिस्तबाग महाल परिसरात अंधारांमध्ये लाल कारमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या औरंगाबादच्या दरोडेखोरांच्या टोळीतील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबेद करून एक तलवार, एक लाकडी दांडके, एक लाल रंगाची स्विफ्ट कार व तेरा मोबाईल फोन असा एकुण 4,78, 200/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संतोष अशोक कांबळे (वय 24, रा. साठेनगर, बाळु पंढरपुर, ता. गंगापुर, जिल्हा संभाजीनगर), रविंद्र बापू चव्हाण (वय 23, रा. कमलापुर रोड, बांळु पंढरपुर, ता. गंगापुर, जिल्हा संभाजीनगर) व रवि आबासाहेब बोरुडे (वय 23, रा. समता कॉलनी वाळुज पंढरपुर, ता. गंगापुर, जिल्हा संभाजीनगर) ही दरोडेखोरांची नावे आहेत.
सदर बातमीची हकिगत अशी की, राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन त्यांचे विरुद्ध कारवाई करणे बाबत यांना आदेश दिले होते.वरील आदेशाप्रमाणे आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई तुषार धाकराव  विजय वेठेकर, संदीप पवार, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, संतोष लोडे, संदीप दरदंले, फुरकान शेख, आकाश काळे व प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्या. नमुद सुचना प्रमाणे पदक अहमदनगर शहर व उपनगर परिसरात फिरून फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, 5 ते 6 इसम लाल रंगाचे कारमध्ये दरोडा टाकण्याचे पूर्व तयारीने तपोवन रोड भिस्तबाग महला जवळ अंधारामध्ये दवा धरुन बसलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमुद ठिकाणी जावून खात्री करून कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने तपोवन रोड भिस्तबाग महला जवळ जावून खात्री केली असता थोडया अंतरावर अंधारामध्ये एक कार व कार जवळ दोन इसम उभे असलेले दिसले पथक कार जवळ जावून संशयीत इसमांना पकडण्याचे तयारीत असताना कार जवळ उभे असलेले दोन इसमांना पथकाची चाहुल लागताच ते पळून गेले व कारचे आत बसलेल्या इसमांना ताब्यात घेतले.
आरोपीकडे विचारपुस करता त्यांनी कोठे तरी दरोड्या सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याचे उद्देशाने आल्याची कबुली दिल्याने आरोपींना सदर मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या इसमांची नावे व पत्ता विचारले असता त्यांनी पळुन गेलेल्या इसमांची नावे व पत्ता ओंकार रोडे (फरार),  अकबर नासिर शेख (फरार) दोन्ही रा. बांळुज पंढरपुर, ता. गंगापुर, जिल्हा संभाजीनगर असे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये  आर्म अ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे  1 जून रोजी दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपींचे पळुन गेलेल्या साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.आरोपी  संतोष अशोक कांबळे व रवी बापू चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द संभाजीनगर व पुणे जिल्ह्यात दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे -03 गुन्हे दाखल आहेत
ही कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी करीत आहे.

No comments:

Post a Comment