गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणार्‍या 3 आरोपींवर कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 1, 2023

गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणार्‍या 3 आरोपींवर कारवाई.

 गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणार्‍या 3 आरोपींवर कारवाई.


अहमदनगर -
जामखेड येथून महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखु विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिररित्या कब्जात बाळगुन वाहतुक करणारे तीन आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन 14,34,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी दिनेश आहेर, स्थागुशा, अ.नगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. वरील आदेशावरून आहेर यांनी 30 मे  रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील मनोहर गोसावी, संदीप पवार, पोना सचिन आडवल, रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ व प्रशांत राठोड अशांना बोलावून जामखेड तालुक्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवून कारवाई करणे बाबत सुचना देवून पथकास तात्काळ रवाना केले. आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, विनोद तोंडे रा. बीड रोड, ता. जामखेड याने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला व तंबाखु विक्री करण्याचे उद्देशाने मालवाहू टेम्पोमधून मागविली असुन ते घेण्यासाठी जामखेड तालुक्यातील लोहारदेवी मंदीरा जवळील मोकळे मैदानात येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने  आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवून कारवाई करणे बाबत आदेश दिले..
पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी लोहारदेवी मंदीरा जवळील मोकळे मैदाना जवळ जावून खात्री केली असता एका अशोक लेलंड छोटया टेम्पोमधून तीन इसम काही गोण्या या टोम्पो जवळच उभ्या असलेल्या पांढरे रंगाचे स्कॉपीटो गाडीमध्ये भरताना दिसले पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकुन सदर इसमांना जागीच पकडुन पोलीसांनी दोन्ही वाहनांची  समक्ष झडती घेता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला हिरागुटखा, पानमसाला व रॉयल तंबाखु असल्याची खात्री झाल्याने तिनही आरोपींना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता टेम्पो चालकाने त्याचे नाव  राजु विठ्ठल शिंदे वय 30, रा. चौसळा, जिल्हा बीड व स्कॉपीओ जवळील इसमांनी त्यांची नावे  मोहित सुभाष मिसाळ वय 19,  योगेश सुखदेव खाडे, बच 19, दोन्ही रा. आनंदवाडी, ता. जामखेड असे सांगितले.
टेम्पो चालक आरोपी नामे राजु शिंदे यास टेम्पो मधील मुद्देमालाबाबत विचारपुस करता त्याने सदर माल हा कर्नाटक येथील शेट्टी याचेकडुन 46 गोण्या हिरा गुटखा, पानमसाला विकत आणून त्यापैकी 30 गोण्या या मंझीरी, ता. पाटोदा, जिल्हा बीड येथील गिले पुर्ण नाव माहित नाही यांना दिल्या व 16 गोण्या या  विनोद छबु तोंडे, रा. बीड रोड, ता. जामखेड (फरार) यांनी विक्री करण्याचे उद्देशाने मागविला होता असे सांगितले. व आरोपी नामे मोहित मिसाळ याचेकडे विचारपुस करता त्याने सदर हिरा गुटखा, पानमसाला व तंबाखुच्या 16 गोण्या विनोद तोंडे याने स्कॉपीओमध्ये भरुन घेवुन येण्यास सांगितले अशी खुली दिलीवर नमुद तीन आरोपींचे ताब्यातून 1,12,000/- रु. किंमतीचा हिरा गुटखा, पानमसाला, 42,000/- रु. किंमतीची रॉयल तंबाखु, 6,00,000/- रु. किंमतीची अशोक लेलंड कंपनीचा मालवाह टेम्पो व 6,00,000/- रु. किंमतीची स्कॉर्पीओ गाडी असा एकुण 14,34,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल बेकायदेशिररित्या कब्जात बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करताना मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन येथे पोकों रणजीत पोपट जाधव, ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे तक्रारी वरुन जामखेड पोलीस स्टेशनमध्ये भादविक 328, 188, 272. 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपीचे फरार साथीदाराचा त्याचे राहते घरी जावुन शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.
ही कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी करीत आहे.

No comments:

Post a Comment