या ठिकाणची घटना; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 2, 2023

या ठिकाणची घटना; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार.

 या ठिकाणची घटना; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार.


छत्रपती संभाजीनगर -
भरधाव मागून येणार्‍या अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात एक तरुण ठार झाला. हा अपघात आडुळ (ता. पैठण) येथील बायपासवरील माऊली - श्री गणेशा लॉन्स जवळ (दि.1) दुपारी दोनच्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार, रामेश्वर शिवाजी जाधव (वय 25, रा. केकत जळगाव ता. पैठण) असे अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर वरुन रामेश्वर जाधव हा आपल्या दुचाकी वरुन केकत जळगाव येथे एक विवाह समारंभ असल्याने त्यांना त्या ठिकाणचे मंडप बांधण्याची सुपारी असल्यामुळे ते गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास येत होते.
आज गावी मंडपासाठी सुपारी असल्याने ते येत असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ बायपास वरील श्रीगणेशा व माऊली या लॉन्स जवळ अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ भोकरवाडी येथील टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेला कळविले असता रुग्णवाहिके वरील कर्मचार्‍यांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून जखमीला रुग्णालयात तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी रामेश्वर जाधव यास तपासून मृत घोषित केले. यानंतर त्यांची उत्तरीय तपासणी झाली.
या अपघातांची नोंद पाचोड पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जग्गन्नाथ उबाळे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment