इंस्टाग्राम मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 14, 2023

इंस्टाग्राम मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार..

 इंस्टाग्राम मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार..


लातूर :
इन्स्टाग्रामवर ‘समिना क्वीन’ नावाने खाते उघडून जवळीक साधत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी दिले. या प्रकरणात एक अल्पवयीन मुलगा असून त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

फिरोज सय्यद (वय १९, रा. जानवळ, ता. चाकूर) हा या घटनेतील मुख्य संशयित आहे. त्याने इन्स्टाग्रामवर ‘समिना क्वीन’ नावाने खाते उघडले आहे. शहरातील एका अल्पवयीन मुलीला त्याने ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवली. यातून दोघांत काही दिवस चॅटिंग सुरू झाले.

इन्स्टाग्रामवरची समोरची व्यक्ती ही एक मुलगीच आहे, असे समजून ही अल्पवयीन मुलगी प्रतिसाद देत राहिली. एके दिवशी या अल्पवयीन मुलीला औसा मार्गावर भेटण्यासाठी बोलावले. समोर आल्यानंतर समोरची व्यक्ती ही मुलगी नसून मुलगा असल्याचे तिच्या लक्षात आले.

एकामेकांशी बोलत असताना फिरोज सय्यद याने या मुलीला जवळ घेऊन फोटो काढले. ‘मला एक गर्लफ्रेंड आणून दे, नाही तर तू तर माझी गर्लफ्रेन्ड हो, अन्यथा हे फोटो तुझ्या वडिलांना पाठवतो’ असे म्हणून फिरोज तिला धमक्या देऊ लागला.

यातून फिरोजने तिला शहराच्या बाहेर नेऊन बलात्कार केला. मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिरोज सय्यद याच्यासह त्याला साथ देणारे तिघे असे चौघांच्या विरोधात बलात्कार, पोक्सो, आयटी ॲक्ट आदी कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला.

No comments:

Post a Comment