शेतात कामाला जायला सांगितल्याचा राग; मुलाने केला वडिलांचा खुन.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 15, 2023

शेतात कामाला जायला सांगितल्याचा राग; मुलाने केला वडिलांचा खुन..

 शेतात कामाला जायला सांगितल्याचा राग; मुलाने केला वडिलांचा खुन..


दिंडोरी :
शेतात कामाला जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने मुलाने डोक्यात फावडे घालून पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील निगडोळ येथे घडली. यासंदर्भात दिंडोरी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर संशयित फरार झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निगडोळ येथील साहेबराव मुरलीधर मालसाने (55) यांनी त्यांचा मुलगा पप्पू उर्फ हिरामण साहेबराव मालसाने याला शेतात काम करायला जा, असे सांगितले. याचा त्याला राग आल्याने त्याने मागचापुढचा विचार न करता संतापाच्या भरात जन्मदात्या साहेबराव मालसाने यांच्या डोक्यात, पाठीवर, हात-पायावर फावड्याचे वार केले. अचानक व अनपेक्षित हल्ल्यामुळे साहेबराव गंभीर जखमी झाले. यात त्यांचा मृत्यू झाला. दुसरा मुलगा गोरख साहेबराव मालसाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिंडोरी पोलिसांनी पप्पूविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलिस उपनिरीक्षक मोनिका जेजोट पुढील तपास करीत आहेत. संशयित पप्पू मालसाने फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


No comments:

Post a Comment