नगर तालुका पोलीस ठाण्याची कारवाई, हॉटेलवर छापा 46 हजारांची दारू जप्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 15, 2023

नगर तालुका पोलीस ठाण्याची कारवाई, हॉटेलवर छापा 46 हजारांची दारू जप्त.

 नगर तालुका पोलीस ठाण्याची कारवाई, हॉटेलवर छापा 46 हजारांची दारू जप्त.


अहमदनगर :
नगर तालुक्यातील वाळूज बायपास येथील आरती हॉटेलवर छापा टाकून 46 हजार 252 रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त करण्याची कारवाई नगर तालुका पोलीसांनी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सपोनि शिशिरकुमार देशमुख यांना नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध दारु विक्रीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सपोनि श्री देशमुख यांनी टिम अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पथक तयार केले. त्यानुसार पथक हे पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलींग दरम्यान नगर तालुका पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने वाळुंज बायपास येथे जाऊन आरती हॉटेल येथे खात्री केली असता तेथे एकजण देशी व विदेशी दारुची विक्री करताना दिसला. पथकाची खात्री पटताच आरती हॉटेलवर छापा टाकून उध्दव सोपान मोरे (रा. वाळुंज ता. जि. अहमदनगर) यास ताब्यात घेतले. तो बसलेल्या ठिकणाची झडती घेतली त्याठिकाणी 46 हजार 252 रुपयांची देशी व विदेशी दारुचा मोठा साठा मिळून आला. याबाबत पोकॉ कमलेश पाथरुट यांच्या फिर्यादीवरून नगर ता. पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार युवराज चव्हाण, कमलेश पाथरुट, जयदिप बांगर, सोमनाथ वडणे, संभाजी बारोडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


No comments:

Post a Comment