शरद पवारांनी घेतली आढावा बैठक; या ४ लोकसभा मतदारसंघांत असणार राष्ट्रवादीचा उमेदवार? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 15, 2023

शरद पवारांनी घेतली आढावा बैठक; या ४ लोकसभा मतदारसंघांत असणार राष्ट्रवादीचा उमेदवार?

 शरद पवारांनी घेतली आढावा बैठक; या ४ लोकसभा मतदारसंघांत असणार राष्ट्रवादीचा उमेदवार?


मुंबई :
 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भातील अमरावती, रामटेक, वर्धा आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा बुधवारी मुंबईत आढावा घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. रामटेक आणि गडचिरोलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
अमरावतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत काही तांत्रिक कारणामुळे राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने त्या उमेदवाराला निवडून दिले. ते आज पक्षासोबत नाही. अमरावतीची जागा राष्ट्रवादीनेच लढावी, यासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यकर्ते आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. शरद पवार यांच्या उपस्थितीत आम्ही राज्यातील लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत. ज्या ठिकाणी आमची ताकद आहे. त्या मतदारसंघाचा आम्ही आढावा घेत आहोत, असे पाटील म्हणाले.

No comments:

Post a Comment