सतत चिडवल्यामुळे आला राग अन्; अल्पवयीन मुलाने केली ४३ वर्षांच्या व्यक्तीची हत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 7, 2023

सतत चिडवल्यामुळे आला राग अन्; अल्पवयीन मुलाने केली ४३ वर्षांच्या व्यक्तीची हत्या.

 सतत चिडवल्यामुळे आला राग अन्; अल्पवयीन मुलाने केली ४३ वर्षांच्या व्यक्तीची हत्या.


मुंबईतील कांदिवली येथे सकाळी एका १७ वर्षीय मुलाने 43 वर्षीय व्यक्तीचा स्क्रू ड्रायव्हरने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाल ताब्यात घेण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलगा अब्दुल रहीम नावाच्या व्यक्तीवर रागावला होता, कारण तो त्या अल्पवयीन मुलाला चिडवत असे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम हा ऑटोरिक्षा चालक आहे. त्याच्या ७५ वर्षीय आई आणि दोन मुलांसोबत तो चाळीत राहत होता. तो नियमित दारू प्यायचा. त्याला इतर अनेक व्यसनेही होती. त्याच्या व्यसनांमुळे, चाळीतील रहिवाशांना तो चिडवायचा अनेक कमेंट्स करायचा त्यांचे चाळीतील अनेकांशी वाद झाले होते. रहिमच्या आईनेही त्याला या वागण्याविरुद्ध इशारा दिला होता.
पोलिसांनी सांगितले की, सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याच चाळीत राहणाऱ्या मुलाने रहिमच्या मानेखाली, उजव्या काखेत आणि डोक्याच्या मागील बाजूस स्क्रू ड्रायव्हरने वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी अब्दुल रहीमला रुग्णालयात दाखल केले. रहीमवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते, मात्र सोमवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितले की, रहीमने त्याला चिडवले, त्याच्या चिडवण्याच्या रागातुन त्याने रहीमवर स्क्रू ड्रायव्हरने वार केले. रहिमचा मुलगा देखील पोलिस स्टेशनमध्ये होता आणि त्यानेही अल्पवयीन मुलाच्या या माहीतीवर शिक्कामोर्तब केले आहे.
पोलिसांनी सोमवारी रात्री मुलाला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर भादंवि कलम 302 (हत्या) नुसार गुन्हा दाखल केला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलाला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आणि नंतर त्याला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment