पारनेरच्या 300 महिलांना मोफत केरळ स्टोरी चे आयोजन.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 7, 2023

पारनेरच्या 300 महिलांना मोफत केरळ स्टोरी चे आयोजन..

 पारनेरच्या 300 महिलांना मोफत केरळ स्टोरी चे आयोजन..

युवकांनी पुढाकार घेत महिलांना दाखवला चित्रपट.


पारनेर - 
पारनेर येथील कट्टर हिंदुत्ववादी संघटनेने  300 महिलांना द केरळ स्टोरी हा चित्रपट मोफत  दाखवला. हा चित्रपट बघण्यासाठी महिलांनी मोठया संख्येने गर्दी केली. यामध्ये युवा मुलींनी मोठ्या संख्येनं सिनेमा बघण्यासाठी आपली पसंती दाखवली तर हा सिनेमा बघितल्यावर आपल्या संस्कृतीला जपणे आजच्या घडीला गरजेचे असल्याचे मत सिनेमा बघितल्यावर महिलांना व्यक्त केले. तर युवा वर्गाने अगोदर आपल्या करियरकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे या सिनेमातून शिकण्यासारखे असल्याचे महिलांनी सांगितले आहे.
'द केरळ स्टोरी' सिनेमाचे पारनेर शहरातील तीनशे महिलांना मोफत दाखवण्यात आला हा चित्रपट शिरूर येथील सिनेमागृहात महिलांनी पाहिला त्यासाठी पारनेर येथून बस चे आयोजन करण्यात आले होते.
विपुल अमृतलाल शाह यांच्या 'द केरल स्टोरी' या सिनेमाची सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे. अनेक ठिकाणी द केरला स्टोरी सिनेमाचं समर्थन होत आहे. लव जिहादच्या नावाखाली महिलांचे होणारे शोषण आणि सद्यस्थिती सारख्या विषयाला चित्रपटातून वाचा फोडण्यात आली आहे. एका अत्यंत वेगळ्या विषयावरील मांडणी करत शाह यांनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे.हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येतं,द केरळा स्टोरीचं चित्रपटाच्या समर्थनाचे बॅनर लावले आहेत. पारनेर येथील समाज माध्यमांवर बॅनरबाजी करत ,चित्रपट बघण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले.
पारनेर येथील कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या युवकांनी एकत्रित येत खास महिलांसाठी मोफत तिकिटांचे आयोजन केले.  महिला व युवतींची तुफान गर्दी झालेली दिसून आली. सिनेमाच्या कथानकाबाबत देशभरातील राजकीय नेत्यांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळत असताना सिनेमा पाहून थिएटरबाहेर पडलेल्या महिलांनी मात्र सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. 
या आयोजनात तुषार औटी अक्षय चेडे संदीप कावरे संभाजी मगर अजिंक्य देशमुख अनिकेत औटी सिद्धांत देशमाने अक्षय देशमुख युवराज देशमुख धीरज महांडुळे आनंद ठोंबरे सुशांत जेऊरकर आदींनी सहभाग घेतला.
चौकट - महिला भगिनींबाबत दुर्घटना घडू नये, देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतरणासारख्या घटना घडत आहेत. त्याची जाणीव महिलांना होऊन यापुढील काळात अशा घटना घडू नयेत. त्यांच्यामध्ये यासंदर्भात जागृती व्हावी, या हेतूने पारनेर येथील महिलांसाठी ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाची मोफत आयोजन केले आहेत असे आयोजक तुषार औटी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment