कुऱ्हाडीचे घाव घालत सुनेकडून सासूची हत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 7, 2023

कुऱ्हाडीचे घाव घालत सुनेकडून सासूची हत्या.

 कुऱ्हाडीचे घाव घालत सुनेकडून सासूची हत्या.


भिवापूर
 तालुक्यातील झिलबोडी येथे रविवारी(ता.४) झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले असून घरगुती वादातून सुनेने सासूचा खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी रक्षंदा शैलेष पाटील(वय २५) हिला अटक झाली आहे.
हिराबाई सिद्धर्थ पाटील(वय ४५) यांचा त्यांच्या घरीच खून झाला होता. त्यांचे तोंड आणि डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव होते. घटनास्थळावरील माहिती आणि पुरावे आणि साक्षीदारांनी दिलेल्या बयाणाच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. खुनात जवळच्याच व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. घटनेच्या दिवशी रक्षंदा आणि हिराबाई ह्या दोघीच होत्या.
त्यामुळे तपासाची सुई वारंवार सुनेजवळच येऊन थांबत होती. श्वान पथकाला पाचारण केले असता तोही घरातच घुटमळत असल्याने घरातील व्यक्तीनेच घात केल्याचा पोलिसांचा संशय बळावला. दोन दिवसांच्या कडक चौकशीनंतर मंगळवारी(ता.६) सायंकाळी पोलिसांनी रक्षंदाला पोलिसांनी अटक केली. घटनेत आणखी कुणी सहभागी आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. आरोपी रक्षंदाला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती गिरासे यांनी दिली.हा घरगुती वाद एवढा विकोपाला गेला की रक्षंदाने कुऱ्हाडीचे घाव घालून सासूला संपविले.

No comments:

Post a Comment