ट्रक अन् कारच्या भीषण‎ अपघातात; एक जण ठार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 15, 2023

ट्रक अन् कारच्या भीषण‎ अपघातात; एक जण ठार.

 ट्रक अन् कारच्या भीषण‎ अपघातात; एक जण ठार.


सुरत ते नागपूर महामार्गावर भदाणे‎ गावाजवळ ट्रकला कारने मागून‎ धडक दिल्याने झालेल्या अपघातात‎ एकाचा जागीच मृत्यू झाला. रात्री हा‎ अपघात झाला.‎ सुरत ते नागपूर महामार्गावरून‎ ट्रक जात‎ होता. त्याच्या मागून इच्छापूर‎ येथील मोहन सरक हे आपल्या‎ कारने‎ जात होते. माल वाहतूक ट्रक‎ चालकाने अचानक वाहनांचे ब्रेक‎ लावले. या वेळी वाहनचालक‎ आपले वाहन नियंत्रित करू शकले‎ नाहीत. त्यामुळे कार थेट ट्रकवर‎ आदळली. हा अपघात एवढा‎ भीषण होता की चालकाचा जागीच‎ मृत्यू झाला.

अपघात एवढा‎ भयानक होता की ट्रक चालकाने‎ कार ४० ते ५० मीटर ओढून नेली.‎ रात्री २ तास गाडी काढायला‎ लागले. घटनास्थळी खूप गर्दी जमा‎ झाली होती. गतिरोधक दिसले नाही‎ म्हणून हा अपघात झाल्याचे‎ सांगितले जात आहे. मृत सरक हे‎ इच्छापूरचे रहिवासी असून, त्यांच्या‎ पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार‎ आहे.‎

No comments:

Post a Comment