नवविवाहितेने गळफास घेऊन केली आत्महत्या.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 17, 2023

नवविवाहितेने गळफास घेऊन केली आत्महत्या..

 नवविवाहितेने गळफास घेऊन केली आत्महत्या..


छत्रपती संभाजीनगर -
 चाळीस दिवसांपूर्वी वडिलांनी थाटामाटात लग्न लावून दिले होते. हातावरच्या मेंदीच्या खुणा पुसल्या नव्हत्या की नव्याकोऱ्या साड्यांचा गंध मिटला नव्हता. पाच दिवसांपूर्वी ती माहेरीही राहून गेली, पण मजुरी करणाऱ्या वडिलांना आणखी भार कशाला म्हणून काही न बोलताच परतली. माहेरहून ५ लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या छळाला कंटाळून अखेरीस तिने गळफास घेऊन स्वत:लाच संपवून घेतले.

ही वेदनादायी कहाणी आहे मुन्शी कॉलनीत राहणाऱ्या निया शेख या २० वर्षीय नवविवाहितेची. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याची तक्रार आहे. छावणी पोलिस ठाण्यात तिच्या सासरच्या मंडळींविरोधात कलम ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या माहेरची मंडळी घाटी रुग्णालयात पोहोचली तेव्हा सासरची मंडळी मृतदेह तेथेच सोडून निघूनही गेली आहे. गुरुवारी १५ जून रोजी रात्री ही घटना उघडकीस आली. सानियाचे वडील कदीर शेख हे फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील रहिवासी आहेत.

No comments:

Post a Comment