वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 23, 2023

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या.

 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या.


मुंबई -
 वाशी‎ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मूळ वाशी‎ येथील एका २२ वर्षीय तरुणीने‎ गळफास‎ ‎ घेत आत्महत्या‎ ‎केली. संजना‎ ‎गायकवाड‎ (२२) असे मृत तरुणीचे नाव असून‎ ती वाशी नगरपंचायतचे विद्यमान‎ स्वीकृत नगरसेवक संतोष गायकवाड‎ यांची मुलगी होती.

छत्रपती‎ संभाजीनगर येेथे एमजीएम‎ महाविद्यालयात ती‎ फिजिओथेरपीच्या दुसऱ्या वर्षात‎ शिकत होती.‎ मागील काही दिवसापासून वाशी‎ येथील कॉलेजरोड लगत असलेल्या‎ घरीच वास्तव्यास आलेली होती.‎ सोमवारी कुटुंबीय शेतात गेलेली‎ असताना स्वतःसाठी स्वतंत्र‎ असलेल्या खोलीमध्ये तिने साडीच्या‎ सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन‎ आत्महत्या केली. सायंकाळी पाच‎ वाजेच्य सुमारास वडील घरी‎ आल्यानंतर घटना उघड झाली.‎

No comments:

Post a Comment