अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी देऊन महिलेकडे खंडणी मागणारा आरोपीचे जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 23, 2023

अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी देऊन महिलेकडे खंडणी मागणारा आरोपीचे जेरबंद.

 अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी देऊन महिलेकडे खंडणी मागणारा आरोपीचे जेरबंद.


नाशिक‎ - 
सोशल मीडियावर महिलांशी ओळख‎ करुन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून‎ ‎त्यांच्याकडे‎ ‎अश्लील फोटो‎ ‎पाठवण्यास सांगत‎ ‎फोटो व्हायरल‎ ‎ करण्याची धमकी ‎ देत खंडणीची‎ मागणी करणाऱ्या संशयिताला अटक‎ करण्यात आली.

सायबर पोलिसांनी‎ गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात ही‎ कारवाई केली. मृत्युंजय उर्फ अंशुमान‎ राजेश पटेल (२४, रा. बलीया,‎ उत्तरप्रदेश) असे या संशयिताचे नाव‎ आहे. न्यायालयाने संशयितास चार‎ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे‎ आदेश दिले.‎ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २०‎ मार्च रोजी सायबर पोलिस ठाण्यात‎ महिलेची तक्रार दाखल झाली होती.‎ पीडित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात‎ ओढून तिला अश्लील फोटो‎ पाठवण्यास संशयिताने भाग पाडले. हे‎ फोटाे सोशल मीडियावर व्हायरल‎ करण्याची धमकी देत महिलेकडे‎ खंडणीची मागणी संशयित करत होता.‎ संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल‎ करण्यात आला होता. पथकाने तांत्रिक बाबींच्या अधारे त्याचा‎ गुजरात येथे माग काढत त्याला अटक‎ केली. गुजरात येथे पाेलिसांांनी सापळा‎ रचून त्यास पकडले. वरीष्ठ निरीक्षक‎ डाॅ. सिताराम कोल्हे, सुरेश कोरबु,‎ किरण जाधव, संतोष काळे, विकास‎ पाटील यांच्या पथकाने ही कारवाई‎ केली.‎

No comments:

Post a Comment