आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती:अहमदनगरचे नाव बदलून 'अहिल्यानगर' ठेवण्याची प्रक्रिया सुरू.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 28, 2023

आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती:अहमदनगरचे नाव बदलून 'अहिल्यानगर' ठेवण्याची प्रक्रिया सुरू..

आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती:अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर ठेवण्याची प्रक्रिया सुरू..
सोलापूर - एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र’ ही राजमाता अहिल्यादेवींची प्रतिमा कायम राहावी, यासाठी सोलापूर विद्यापीठ परिसरात अश्वारूढ पुतळाही उभारण्यात येईल. शासनाने त्याची मागणी मान्य केल्याची माहिती विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी येथे दिली. अहमदनगर हे नाव बदलून लवकरच ‘अहिल्यानगर’ होईल, असेही ते म्हणाले.
भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्ती वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. आमदार विजयकुमार देशमुख, औशाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी महापौर महेश कोठे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील आदी मान्यवर मंचावर होते. मुरारजी पेठेतील सुशील रसिक सभागृह येथे हा कार्यक्रम झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सूरज बंडगर यांनी स्वागत केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

No comments:

Post a Comment