ट्रकची दुचाकीला धडक, पत्नीला कामावर नेताना‎ अपघात पतीचा मृत्यू‎.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 28, 2023

ट्रकची दुचाकीला धडक, पत्नीला कामावर नेताना‎ अपघात पतीचा मृत्यू‎..

दुचाकीला ट्रकची धडक, पत्नीला कामावर नेताना‎ अपघात पतीचा मृत्यू‎..
जळगाव‎ - पत्नीला घेऊन कामावर सोडण्यासाठी‎ दुचाकीने पती निघाला. मात्र, काळाने‎ ‎ कूस बसलली आणि‎ ‎ त्यांच्या दुचाकीला‎ ‎ भरधाव ट्रकने‎ ‎ उडवले. त्यात पतीचा‎ ‎ मृत्यू झाला तर पत्नी‎ गंभीर जखमी आहे.‎ हा अपघात शनिवारी‎ ‎ दुपारी बांभोरी‎ गावाजवळ घडला. घटनेची माहिती‎ मिळाल्यानंतर नातेवाईकांसह ग्रामस्थांनी‎ गर्दी केली होती.
अपघातामुळे काही‎ वेळ वाहतूकही ठप्प झाली हाेती.‎ हेमंत काशिनाथ चौधरी (वय ५०, रा.‎ खोटेनगर, जळगाव) असे मृताचे नाव‎ आहे. ते त्यांच्या पत्नी माधवी यांना जैन‎ इरिगेशन कंपनीत कामावर‎ सोडण्यासाठी जात असताना हा‎ अपघात झाला. जखमी महिलेस जिल्हा‎ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात‎ उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.‎ हेमंत चौधरी हे पोलनपेठेतील मेडीकल‎ डिस्ट्रीब्युटरमध्ये कामाला आहेत.‎ त्यांच्या पत्नी माधवी बांभोरी‎ गावाजवळील जैन कंपनीत कामावर‎ आहेत. शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या‎ सुमारास ते पत्नीला कामावर‎ सोडण्यासाठी जैन कंपनी जवळून‎ जाताना महामार्गावर धरणगाव‎ तालुक्यातील बांभोरी गावाजवळ एका‎ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या‎ दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक‎ दिली. या धडकेत चौधरी दांपत्य हे‎ दुचाकीसह महामार्गाच्या खाली फेकले‎ गेले. त्यात दोघांच्या डोक्याला गंभीर‎ दुखापत झाली. स्थानिक ग्रामस्थ व‎ तरुणांच्या मदतीने जखमींना तातडीने‎ जिल्हा शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालयात उपारार्थ दाखल‎ करण्यात आले होते. उपचारादरम्यान‎ हेमंत चौधरी यांचा मृत्यू झाला. या‎ अपघातप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा‎ दाखल झालेला नव्हता. अपघात‎ घडल्यानंतर मात्र संबंधित वाहनासह‎ त्यावरील चालक पसार झाला आहे.

No comments:

Post a Comment