आई, भावाला सावकाराचा प्रचंड त्रास:स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 28, 2023

आई, भावाला सावकाराचा प्रचंड त्रास:स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या..

आई, भावाला सावकाराचा प्रचंड त्रास:स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या..
शिरपूर - आई व भावाला खासगी सावकार त्रास देत असल्याचे स्टेटस मोबाइलवर ठेवत एका तरुणाने तापी नदीत उडी घेत आत्महत्या केली. मयूर उर्फ बंटी दीपक धनगर (वय २३) असे या तरूणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
शहरातील क्रांती नगर भागात मयूर धनगर राहत होता. तो एका दुकानात कपडे शिवण्याचे काम करत होता. त्यानूसार शनिवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामाला गेला. त्यानंतर दुपारी घरी जेवणाला येण्याऐवजी तो सरळ तापी नदीवर गेला. दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास आत्महत्येपूर्वी बंटीने त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर माझ्या आईवर आणि भावावर कर्ज झाले आहे. कर्ज देणारे सावकार खूप त्रास देत आहे. त्यामुळे मी आत्महत्या करतो आहे, असे लिहिले. त्यानंतर तापी नदीत उडी घेतली.
त्याला उडी घेताना काहींनी बघितले. त्यानंतर मच्छिमारांच्या मदतीने त्याचा मृतदेह तापी नदीतून बाहेर काढण्यात आला. बंटी धनगरच्या वडीलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्याची आई अंगणवाडी सेविका आहे. बंटीच्या कुटुंबात दोन भाऊ व एक बहिण आहे. बंटीच्या मोठ्या भावाने काही जणांकडून कर्ज घेतले होते. अवाजवी व्याजदरामुळे कर्जाची रक्कम वाढत गेली. संशयित सावकार बंटीच्या भावाला मारहाण करुन वसुली करत होते. त्यामुळे त्याच्या भावाने काही दिवसापूर्वी शिरपूर सोडले. त्यानंतर सावकारांनी बंटीला धमकावणे सुरु केले होते. त्यांच्या त्रासाला वैतागून बंटी धनगरने आत्महत्या केल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.

No comments:

Post a Comment