ब्रेक फेल झाल्यानं शिवशाही बसचा विचीत्र अपघात.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 26, 2023

ब्रेक फेल झाल्यानं शिवशाही बसचा विचीत्र अपघात..

ब्रेक फेल झाल्यानं शिवशाही बसचा विचीत्र अपघात..
पुणे - पुण्यात ब्रेक फेल झाल्यानं शिवशाही बसचा विचीत्र अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी नाही. 25 प्रवासी बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्यानं शिवशाही बस थेट फुटपाथच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. बसचं धडकेत मोठं नुकसान झाल. तर झाडही जमीनीवर कोसळलं. आज सकाळी ही घटना घडली. संगमवाडीच्या बाळासाहेब ठाकरे चौकातली घटना आहे.
यापूर्वीही राज्यात शिवशाही बस अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. एसटी महामंडळात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस त्याच्या सुविधांपेक्षा अपघातांमुळेच जास्त चर्चेत असते. शिवशाही बस सेवेत आल्यापासून होत असलेल्या अपघातांचे सत्र थांबलेले नाही.

No comments:

Post a Comment