सुपा-पारनेर रोडवर अपघात; दोन ठार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 26, 2023

सुपा-पारनेर रोडवर अपघात; दोन ठार..

सुपा-पारनेर रोडवर अपघात; दोन ठार..
सुपा - गुरुवारी सायंकाळी सुपा-पारनेर रोडवर हंगा शिवारात मोटारसायकलवरील दोघे झाडावर आदळ्याने जागीच ठार झाले. 
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, गुरूवार सांयकाळी सात ते आठ च्या दरम्यान सुपा पारनेर रोडवर हंगा शिवारातील आमकडा भागात मोटारसायकल या गाडीवरुन पारनेर वरुन सुप्याच्या दिशेने येत होते. हंगा शिवारातील आमकडा भागातील सोंडकर वस्ती जवळ वळना वळनाचा रस्ता आसल्याने मोटारसायकल स्वराचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ते रस्त्याच्या कडेला आसलेल्या चिंचेच्या झाडावर जाऊन आदळले. गाडीचा वेग जास्त आसल्याने दोघेही जबर जखमी होऊन जागीच ठार झाले.
घटनेची माहिती कळताच पोलिस निरिक्षक  ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही अपघात ग्रस्तांना तात्काळ पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दोन्ही अपघात ग्रस्तांना जास्त मार लागल्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती व स्थानिक नागरिकांचे म्हणणे हे या परिसरातील वाटत नाही पोलिस संपत खैरे यांनी घटनेचा पंचनामा केला व लगेचच तपास चालू केला. अपघातग्रस्थाची ओळख पटत नसल्याने सुपा पोलिसांनी गाडी नंबर वरुन शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मोबाईलवरुनही त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुपा पोलिस करत आहेत.

No comments:

Post a Comment