नगर शहरातील हिंदुत्ववादी मुलांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, फडणवीसांना निवेदन.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 26, 2023

नगर शहरातील हिंदुत्ववादी मुलांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, फडणवीसांना निवेदन..

 नगर शहरातील हिंदुत्ववादी मुलांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, फडणवीसांना निवेदन..


अहमदनगर:
आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नगर दौऱ्यावर असताना शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना राज्य उपसचिव विक्रम राठोड यांनी फडणवीस यांना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एक निवेदन देत हिंदुत्ववादी मुलांवर दाखल खोटे गुन्ह्यांबाबत दखल देत लक्ष देऊन उचित कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली.
निवेदनात म्हंटले आहे की, नगर शहरात गेल्या २५ ते ३० वर्षापासून हिंदुधर्मरक्षक मा. आ. अनिलभैय्या राठोड यांच्या नेतृत्वाखाली अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र झाले. हिंदुत्वाची मुहुर्तमेढ रोवली. असे असताना आजचे तथाकथित राजकीय पुढारी हिंदुत्वाच्या बाजूने काम केल्यास अॅट्रासिटी व विनयभंगासारखे गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल करुन त्यांचे करियर बरबाद करत आहेत, याची दखल घेवून उचित कार्यवाही करावी व पोलिस प्रशासनाला योग्य आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment