महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत ओंकार ढोलेचे यश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 26, 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत ओंकार ढोलेचे यश.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत ओंकार ढोलेचे यश.


अहमदनगर -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत ओंकार ढोले यांची गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर (सरकारी कामगार अधिकारी) पदी निवड झाली आहे.
ओंकारचे ञाथमिक शिक्षण जि. प. प्रा. शाळा, कुकाणा व माध्यमिक शिक्षण नवोदय विद्याय व काकडे हायस्कूल, शेवगाव येथे झाले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पुणे येथे संपादन केली. नंतर ते स्पर्धापरीक्षेकडे वळले. जिद्द, अभ्यास आणि सातत्य तसेच त्यांच्यावर असणार्‍या परिस्थितीची जाण यामुळे ते यशस्वी झाल्याचे सांगतात.
यापूर्वी ते मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर कार्यरत होते. सध्या ते वनपरिक्षेत्र अधिकारी (ठऋज) पदावर कार्यरत आहेत. प्रशासकीय सेवेत काम करत असतानाच तिसर्‍यांदा ते या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. जि. प. प्राथमिक शिक्षिका आशा ढोले यांचे ते सुपुत्र आहेत.
कोणत्याही प्रकारचे क्लासेस न लावता स्वयंअध्ययनाने ते या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाल्याचे सांगतात.

No comments:

Post a Comment