नगरच्या उड्डाणपुलावर पुन्हा अपघात ; २ तरुणांचा मृत्यू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 30, 2023

नगरच्या उड्डाणपुलावर पुन्हा अपघात ; २ तरुणांचा मृत्यू.

नगरच्या उड्डाणपुलावर पुन्हा अपघात ; २ तरुणांचा मृत्यू.
अहमदनगर – उड्डाणपुलावर असलेल्या धोकादायक वळणामुळे पुन्हा एकदा अपघात होऊन त्यात दोन तरुणांना प्राण गमवावे लागले आहेत तर एक जण जखमी झाला आहे. सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास हा अपघात झाला.
सुफियान समीर शेख (वय २८) व रेहान अस्लम शेख (वय २०, दोघे रा.कोंढवा, पुणे) असे या अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर एक जण जखमी झाला असून त्याच्यावर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचे नाव समजू शकले नाही.
सदरील मयत व जखमी असे तिघे जण इनोव्हा कारने पुण्याहून छत्रपती संभाजीनगर कडे नगर मार्गे जात होते. उड्डाणुपलावर चांदणी चौकाजवळ असलेल्या वळणाचा चालकाला अंदाज न आल्याने त्यांची इनोव्हा कार रस्ता दुभाजकाला जोरात धडकली. या अपघातात कार चालक व त्या शेजारील बसलेला युवक असे दोघे जण गंभीर जखमी होऊन मयत झाले तर एक जण जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळकाच स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले मात्र तत्पुर्वी दोघांचा मृत्यू झाला होता. तर जखमी झालेल्या व्यक्तीला अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

No comments:

Post a Comment