भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेड्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 30, 2023

भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेड्या.

भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेड्या.
अहमदनगर :-अल्पवयीन मुलीवर लैगींक अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात भिंगार कॅम्प पोलीसांना यश आले आहे. घटनेतील सविस्तर माहिती अशी की,दि.25/02/2023 रोजी सायंकाळी 7/00 वा.सुमा.फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी हीस कोणीतरी काहीतरी आमीष दाखवून फूस लावून पळवून नेले बाबत दि.26/02/2023 रोजी भिंगार कॅम्प पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना यातील अपहरीत अल्पवयीन मुलगी ही मिळून आली.
सदरचा आरोपी हा वेळोवेळी पोलीसांना गुंगारा देऊन फरार होता.कॅम्प पोस्टेचे श्री.दिनकर एस मुंडे यांना गोपनिय बातमी दारा मार्फत माहीती मिळाली कि,भिंगार या गुन्ह्यातील फरार आरोपी नामे मयुर रमेश बारस्कर(रा.निंबोडी ता.जि. अहमदनगर) हा जामखेड रोड परीसरात आला आहे.अशी माहीती मिळाल्याने कॅम्प पोस्टे कडील एक स्वतंत्र पथकाने सापळा लावून त्यास ताब्यात घेऊन त्यास सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे,सहा.पोलिस निरीक्षक श्री.दिनकर मुंडे, मंगेश बेंडकोळी, कैलास सोनार, संदिप घोडके, गणेश नागरगोजे, रेवननाथ दहीफळे, राहुल द्वारके, दिलीप शिंदे,यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment