हॉर्न वाजवल्याने दोघास जमावाचा चोप, भांडणात धारदार शस्त्रांचा वापर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 29, 2023

हॉर्न वाजवल्याने दोघास जमावाचा चोप, भांडणात धारदार शस्त्रांचा वापर.

 हॉर्न वाजवल्याने दोघास जमावाचा चोप,भांडणात धारदार शस्त्रांचा वापर.


संगमनेर -
संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.यात धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला असून सहा जण जखमी झाल्याची माहिती समजतेय,शहरात तणापूर्ण वातावरण असून राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी घडली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, जोर्वे येथील काही युवक संगमनेरला आले होते.संगमनेर येथील काम आटोपून ते आपल्या घरी जात होते.जोर्वे नाका परिसरात हे युवक आले असता या ठिकाणी रहदारी ठप्प झालेली होती.युवकांनी आपल्या मोटरसायकलचे हॉर्न वाजवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने जोर्वे नाका परिसरात थांबलेल्या काही लोकांनी या दोन युवकांना मारहाण केली.यावेळी जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.यानंतर हे युवक जोर्वे येथे निघून गेले. त्यांनी घडलेला प्रकार गावात सांगितला.यानंतर जोर्वे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात आले.त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली.पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.यानंतर हे ग्रामस्थ जोर्वे येथील जात होते.जार्वेे नाका परिसरात एका समाजाच्या युवकांनी या नागरिकांना अडविले.या ठिकाणी जोरदार जोरदार शिवीगाळ आणि हाणामारी झाली.एका समाजाच्या काही युवकांनी धारदार शास्त्रांचा वापर केला. या हाणामारीत जोर्वे येथील सहाजण जखमी झाले. जखमींमध्ये जितेंद्र दिघे,अजित थोरात,सुमीत थोरात, तन्मय दिघे,विजय थोरात, कुंडलिक दिघे यांचा समावेश आहे.धारदार शास्त्रांचा वापर झाल्याने सर्वजण गंभीर जखमी झाले.शहरातील जोर्वेेे नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे.या अतिक्रमणामुळेच कालची घटना घडली नगरपालिका प्रशासनाने रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले या अतिक्रमणाला एका युवकाने विरोध केला.यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम काही वेळा थांबवण्यात आली होती.

No comments:

Post a Comment