घरफोडी चोरी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 27, 2023

घरफोडी चोरी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद.

 स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

घरफोडी चोरी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद.


अहमदनगर -
पाथर्डी परिसरात घरात प्रवेश करुन, घरफोडी चोरी करणार्‍या अरुण अभिमान काळे (वय 24, रा. पारनेर, ता. पाटोदा, जिल्हा बीड), पवन भरत काळे (वय 19, रा. हरीनारायणआष्टा, ता. आष्टी, जिल्हा बीड) या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असुन आरोपीच्या कब्जातून 3,25,000/- हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 50,000/- हजार रुपये किंमतीची काळे रंगाची स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण 3,75,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांना पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपी नामे अरुण अभिमान काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द पुणे, बीड व अहमदनगर जिल्ह्यात चोरी, गंभीर दुखापत व इतर कलमान्वये एकुण 03 गुन्हे दाखल आहेत
बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी . किरण रमेश लाटणे वय 43, रा. जयभवानी चौक, ता. पाथर्डी यांचे घराचा कडीकोंडा अज्ञात आरोपींनी अज्ञात हत्याराने तोडुन घरात प्रवेश करून, घरातील सामानाची उचकापाचक करुन 15,000/- हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करुन चोरुन नेले होते. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरुन पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये भादविक 457, 380 प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घरफोडीची घटना घडल्यानंतर राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील हेमंत धोरात, तुषार धाकराव, सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, रविंद्र कर्डिले, विशाल दळवी, भिमराज खसे, संतोष लोढे, संदीप दरदले, फुरकान शेख, परविंद्र घुगांसे, प्रशांत राठोड चंद्रकांत कुसळकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांना नेमुन सदर ना उघड गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना  करून पथकास तात्काळ रवाना केले.
पथक शेवगांव व पाथर्डी परिसरात पेट्रोलिंग करुन ना उप गुन्ह्यातील आरोपांची माहिती घेत असताना आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी दोन इसम काळे रंगाचे स्प्लेंडर मोटार सायकलवर शेवगांवच्या दिशेने जाणार आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने  पथक तात्काळ तिसगांव, ता. पाथर्डी येथे जावुन रोडवर सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे दोन इसम काळे रंगाचे स्प्लेडर मोटार सायकलवर येताना दिसले पथकाने संशयीतांना हात दाखवून थांबण्याचा इशारा करताच त्यांनी मोटार सायकल पाथर्डीच्या दिशेने वळवून पळून जावु लागले. पथकाने लागलीच त्यांचा पाठलाग करून संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले.
त्यांची अंगझडती घेतात्यांचे अंगझडतीमध्ये एका प्लॅस्टीकचे पिशवीत मिळुन आला त्याबाबत विचारपुस करता त्यांनी पाथर्डी परिसरात घरात घुसून चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी जात असलेबाबत माहिती दिल्याने दोन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपींना विश्वासात घेवून अहमदनगर जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी व कोठे कोठे घरफोडी चोरी केली आहे या बाबत विचारपुस करता आरोपींनी जयभवानी चौक व तनपुरवाडी, ता. पाथर्डी येथील घरात प्रवेश करुन चोरी केल्याची कबुली दिल्याने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता आरोपीकडून मोठ्या प्रमाणात प्रमाणे गुन्हा उघडकिस आला आहे.
ही कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

No comments:

Post a Comment