रात्रीच्या वेळी डिझेल चोरणारी टोळी जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 27, 2023

रात्रीच्या वेळी डिझेल चोरणारी टोळी जेरबंद.

रात्रीच्या वेळी डिझेल चोरणारी टोळी जेरबंद.


अहमदनगर -
नगर जिल्ह्यात रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपातून डिझेलची चोरी करणार्‍या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला असून उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील जोगेश्वर वस्तीतून या टोळीच्या प्रमुखाला ताब्यात घेतले असून संगमनेर मधील पेट्रोल पंपावरील चोरी गेलेले 280 लिटर डिझेल व गुन्हा करताना वापरलेला 15,00,000/- रुपये किंमतीचा ट्रक व 26,320/- रुपये किंमतीचे 280 लिटर डिझेल असा एकुण 15,26,320/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई संगमनेर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी मनोज पितांबर झांबरे, वय 35, रा. संगमनेर यांचे मालकीचा कसारे, ता. संगमनेर येथील साई बालाजी पेट्रोलपंपावरील नाईट ड्युटीस असलेले कर्मचारी केबिनमध्ये झोपलेले असताना अनोळखी आरोपींनी फिर्यादीचे पेट्रोल पंपावरील 3,52,330/- रुपये किंमतीचे 3.780 लिटर डिझेल चोरी करुन घेवुन गेले होते. सदर घटेन बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादविक 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर चोरीची घटना घडल्यानंतर राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील हिमंत थोरात, विजय वेठेकर, संदीप पवार, अतुल लोटके, रविंद्र कर्डिले. फुरकान शेख, ज्ञानेश्वर शिंदे, मच्छिद्र बडे, मयुर गायकवाड, रविंद्र घुगांसे, रणजीत जाधव, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, अशोक काळे, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, अमृत आढाव व चापोहेको उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके तयार करून डिझेल चोरी करणारे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्याने पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे जामखेड, खड़ व उस्मानाबाद परिसरात फिरून आरोपींची माहिती घेत असताना आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे तान्हाजी काळे रा. जोगेश्वरी वस्ती, ता. वाशि, जिल्हा उस्मानाबाद याने त्यांचे साथीदारासह कसारे, ता. संगमनेर येथील पेट्रोलपंपावरील चोरी केलेले डिझेल व वाहतुकीसाठी वापरलेली ट्रक त्याचे राहते घरासमोर लावलेली आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने . पथक लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जोगेश्वरीवस्ती, ता. वाशि, जिल्हा उस्मानाबाद येथे जावून आरोपींचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन घराजवळ जावून खात्री केली असता एक विटकरी रंगाचा ट्रक लावलेला दिसला पथकची खात्री होताच घरामध्ये हजर असलेल्या इसमास बाहेर बोलवून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव  तान्हाजी अशोक काळे रा. जोगेश्वरीवस्ती, पारा, ता. वाशि, जिल्हा उस्मानाबाद असे सांगितले. त्याचेकडे घरासमोर लावलेल्या ट्रकबाबत विचारपुस करता त्याने सदर ट्रक त्याचा मेहुणा नामे मुरलीधर पिंटु शिंदे याचा असल्याचे सांगितले. सदर ट्रकची  झडती घेतात्यामध्ये डिझेलने भरलेले प्लॅस्टीकचे ड्रम मिळुन आले त्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचे इतर साथीदार नामे  ज्ञानेश्वर विनायक शिंदे रा. जोगेश्वरीवस्ती, पारा, ता. वाशि, जिल्हा उस्मानाबाद, पोपट व्यंकट पवार रा. येरमाळा, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद,  अर्जुन व्यंकट पवार, रा. जोगेश्वरीवस्ती, पारा, ता. वाशि, जिल्हा उस्मानाबाद (फरार)  आनंद पवार, रा. आळणी, ता. जिल्हा उस्मानाबद (फरार) व  दत्तु शिंदे रा. पारा, ता. वाशि, जिल्हा उस्मानाबाद (फरार) अशांनी मिळुन संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथील पेट्रोल पंपावरून डिझेल चोरी करून आणल्याचे माहिती दिल्याने त्यास ताब्यात घेतले व त्याचे इतर साथीदारांचा शोध घेता दोन साथीदार मिळुन आल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना अधिक विश्वासात घेवून अहमदनगर जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी व कोठे कोठे डिझेल चोरीचे गुन्हे केले आहे याबाबत विचारपुस करता आरोपी नामे तान्हाजी काळे व ज्ञानेश्वर शिंदे यांनी पाथर्डी व शेवगांव येथील पेट्रोल पंपावर डिझेल चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपी नामे पोपट व्यंकट पवार हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द उस्मानाबाद जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न व दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण -02 गुन्हे दाखल आहेत
ही कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मैडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,  संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी करीत आहे.

No comments:

Post a Comment