घरातील सोने लुटून नंतर धारदार शस्त्राने केला एकाचा खून. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 23, 2023

घरातील सोने लुटून नंतर धारदार शस्त्राने केला एकाचा खून.

घरातील सोने लुटून नंतर धारदार शस्त्राने केला एकाचा खून.
पाथर्डी :-पाथर्डी शहरातील रंगारगल्ली येथे राहणारे संजय रामचंद्र गुरसाळी हे व त्यांच्या घरातील सर्वजण वेगवेगळ्या रूममध्ये झोपले असताना,त्यांच्या घरात कोणीतरी अज्ञात इसमाने प्रवेश करून कपाटात ठेवलेले चार लाख आठ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने यांची चोरी करून संजय रामचंद्र गुरसाळी यांच्या डाव्या कानाच्या पाठीमागे धारदार शास्त्राने मारहाण करूत त्यांना जीवेच ठार मारले.ही घटना मंगळवार पहाटेच्या सुमारास घडली आहे. एका महिलेच्या खून पुन्हा पुरुषाचा खून या दोन्ही घटनेने पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.राजेंद्र रामचंद्र गुरसाळी यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment