या कारणामुळे नवविवाहित दाम्पत्याची रेल्वेखाली आत्महत्या, घटनेनंतर वडिलांनीही संपवले जीवन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 24, 2023

या कारणामुळे नवविवाहित दाम्पत्याची रेल्वेखाली आत्महत्या, घटनेनंतर वडिलांनीही संपवले जीवन.

 या कारणामुळे नवविवाहित दाम्पत्याची रेल्वेखाली आत्महत्या, घटनेनंतर वडिलांनीही संपवले जीवन.


नवापूर -
 वडिलांनी नवीन मोटारसायकल घेऊन न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून नवविवाहित दाम्पत्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे समोर आली आहे. मुलगा आणि सुनेने आत्महत्या केल्याचा विरह सहन न झाल्याने वडिलांनीही रेल्वेखाली झोकून देत जीवन संपवले. 

मुलगा सावन सय्यद गावित त्याची पत्नी रोशनी सावन गावित आणि वडील सय्यद कर्मा गावित(रा. तिनटेंबा, नवापूर) अशी तिघा मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार सय्यद गावित व मुलगा सावन हे मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते.

सावन आणि रोशनी यांचा नुकताच २२ फेब्रुवारी २०२३ रोजी विवाह झाला होता. लग्नाला तीन महिने होत नाही तोच ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. सावन याने वडिलांकडे नव्या मोटारसायकलची मागणी केली. मात्र, वडिलांनी ती खरेदी करण्यास नकार दिला होता. त्यावरून घरात दोघांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाले. रागाच्याभरात सावन आणि रोशनी यांनी टोकाचे पाऊल उचलत सोमवारी रात्री फुलफळी भागातील रेल्वे रुळावर स्वत:ला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना वडील सय्यद यांना कळताच ते भावनाविवश झाले. मुलगा आणि सून यांचा विरह सहन न झाल्यामुळे त्यांनीही रेल्वेखाली झोकून देत आपले जीवनयात्रा संपवली.No comments:

Post a Comment