बहिणीने म्हैस विकून ठेवलेले‎ पैसे, भावानेच पळवले‎, भावावर गुन्हा दाखल‎. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 28, 2023

बहिणीने म्हैस विकून ठेवलेले‎ पैसे, भावानेच पळवले‎, भावावर गुन्हा दाखल‎.

बहिणीने म्हैस विकून ठेवलेले‎ पैसे, भावानेच पळवले‎, भावावर गुन्हा दाखल‎.


बाहेरगावी गेलेल्या महिलेच्या घरातील‎ रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा दोन‎ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल‎ भावानेच चोरून नेल्याप्रकरणी बहिणीने‎ भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.‎ शनिवारी गुन्हा दाखल झाला.‎ मोहोळ पोलिसांनी दिलेल्या‎ माहितीनुसार, औंढी (ता. मोहोळ)‎ येथील गोकर्णा बाळू घोडके मोलमजुरी‎ करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे‎ एक महिन्यापासून त्यांचा भाऊ अमोल‎ पोपट कांबळे (रा. वाळूज, ता. मोहोळ)‎ हा राहण्यास आला होता. दि. १८ मे रोजी‎ फिर्यादी गोकर्णा या मुलासमावेत नरखेड‎ येथे मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या.‎ त्यादरम्यान गोकर्णा यांचे पती बाळू हे‎ मजुरीसाठी गेले होते. त्यांचा भाऊ अमोल‎ कांबळे हा घरात एकटाच होता. गोकर्णा‎ घोडके यांनी जाताना कपाटात म्हैस विकून‎ आलेली एक लाख रुपये व सोन्याचे‎ दागिने ठेवून सदर कपाटात ठेवले होते.‎ दरम्यान सायंकाळी बाळू घोडके यांनी‎ पत्नीला फोन करून सांगितले की, अमोल‎ कांबळे हा घरात दिसत नाही. घरातील‎ लोखंडी कपाटाचे कुलूप तुटलेले आहे.‎ त्यावेळी नरखेडहून गोकर्णा आल्या.‎ कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने‎ पाहिले नव्हते. त्यांनी भाऊ अमोल संशय‎ व्यक्त करत शनिवारी (दि. २७) मोहोळ‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

No comments:

Post a Comment