नगर शहरातील घटना, अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यास कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 29, 2023

नगर शहरातील घटना, अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यास कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात.

 नगर शहरातील घटना, अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यास कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात.


अहमदनगर -
शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कुल मैदानावर अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्या इसमास ताब्यात घेत कोतवाली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,एक इसम हा अहमदनगर शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कुल मैदानावर अवैधरित्या तलवार घेवून येणार आहे.आत्ता गेल्यास तो मिळून येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांना सदर ठिकाणी जावून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून बातमीतील नमुद इसमास सापळा लावुन शिताफीने जागीच पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव करण कृष्णा फसले (वय ३० वर्ष,रा. खिस्तगल्ली,अहमदनगर) असे सांगुन त्याचे कब्जात एक तलवार मिळून आली. कोतवाली पोलीस स्टेशनचे पोकॉ/कैलास दत्तु शिरसाठ यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं.५४३/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास योगेश खामकर हे करत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, मनोज कचरे,पोलीस अंमलदार/तनवीर शेख,गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे,अभय कदम,संदिप थोरात,अमोल गाढे,सुजय हिवाळे,सोमनाथ राऊत,कैलास शिरसाठ,सागर मिसाळ,अतुल काजळे यांच्या पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment