कोयत्याचा धाकाने नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारी टोळी जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 30, 2023

कोयत्याचा धाकाने नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारी टोळी जेरबंद.

 कोयत्याचा धाकाने नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारी टोळी जेरबंद.


पुणे -
कोयत्याचा धाकाने नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या टोळीला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे. मागील काही महिन्यांपासून आरोपी पसार झाले होते. मात्र, माहिती मिळताच पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

विशाल शिवाजी पाटोळे (वय १९), शुभम अनिल ताकतोडे( वय १९ दोघे रा. आंबेडकरनगर मार्क,पुणे )आणि अभी राजेश वाघमारे (वय १९ रा. बिबवेनगर,पुणे) अशी अटक केलेल्यांच नावे आहेत.मार्केटयार्ड पोलिस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कोयता गँगमधील पसार आरोपी डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये असल्याची माहिती मदन कांबळे आणि आशिष यादव यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, एसीपी पौर्णिमा तावरे पोलिस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे, एपीआय मदन कांबळे, दिपक मोधे, आशिष यादव, झायटे यांनी केली.

No comments:

Post a Comment