नगर जिल्ह्यात 2 दिवसांत 6 बालविवाह रोखले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 30, 2023

नगर जिल्ह्यात 2 दिवसांत 6 बालविवाह रोखले.

 नगर जिल्ह्यात 2 दिवसांत 6 बालविवाह रोखले.


अहमदनगर - 
ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात लपून-छपून बालविवाह उरकण्याचे प्रकार‎ सुरू आहेत. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही, अनेक पालक तिचे हात ‎पिवळे करण्याचा प्रयत्न करतात.‎ प्रशासनाकडून जनजागृती केली जाते, असे‎ प्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात,‎ अनेकदा जेलची हवा खावी लागते, तरीही हे‎ प्रकार थांबताना दिसत नाहीत.‎ गेल्या दोन दिवसांत असे सहा बालविवाह ‎रोखण्यात यश आले आहे.

‘चाईल्ड लाईन’‎ या सेवाभावी संस्थेच्या १०९८ या मोफत ‎क्रमांकावर मिळालेल्या माहितीनुसार‎ तात्काळ पावले उचलण्यात आल्याने हे‎ बालविवाह रोखण्यात यश आले. नगर‎ जिल्ह्यातील कोपरगाव, जामखेड, पारनेर,‎ ‎‎ राहुरी, नेवासे व अहमदनगर शहर येथील‎ अल्पवयीन मुलींचे बालविवाह होत होते.‎ प्रशासनाने हे सर्व विवाह वेळीच माहिती‎ मिळाल्याने रोखले. चाईल्ड लाईनचे केंद्र‎ समन्वयक महेश सूर्यवंशी यांच्या‎ अध्यक्षतेखाली समुपदेशक अलिम पठाण व‎ टीम मेंबर राहुल कांबळे यांनी ताबडतोब या‎ घटनांची माहिती घेतली. नंतर अहमदनगर‎ बालकल्याण समिती, जिल्हा महिला व‎ बालविकास अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण‎ कक्ष, पोलिस स्टेशन, बालविवाह प्रतिबंधक‎ अधिकारी यांना बालविवाह रोखण्यासंबंधित‎ पत्रव्यवहार करण्यात आले.‎ माहिती मिळालेल्या ठिकाणचे स्थानिक‎ अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्याकडून‎ घटनास्थळी पोहोचून कारवाई करण्यात‎ आली. त्यामुळे संभाव्य बालविवाह रोखण्यात‎ यश आले. संबंधित मुलगा-मुलीच्या‎ पालकांना जिल्हा बालकल्याण समितीसमोर‎ हजर राहण्याचे निर्देश बालविवाह प्रतिबंधक‎ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात कोठेही‎ बालविवाह होत असल्यास, प्रशासन व‎ चाईल्ड लाईनशी संपर्क साधावा, असे‎ आवाहन करण्यात आले आहे.‎

No comments:

Post a Comment