अनोळखी व्यक्तीसोबत तरुणीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा प्रयत्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 30, 2023

अनोळखी व्यक्तीसोबत तरुणीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा प्रयत्न.

 अनोळखी व्यक्तीसोबत तरुणीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा प्रयत्न;गुन्हा दाखल.


छत्रपती संभाजीनगर - 
कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता एका अनोळखी व्यक्तीसोबत तरुणीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह अन्य एकाविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

वाळूज औद्योगिक परिसरातील जोगेश्वरी येथील २५ वर्षीय तरुणीला तिच्या परिचयाची एक महिला व शाहरुख सय्यद यांनी चितेगाव येथील एका खोलीत नेत डांबून ठेवले. तुझे लग्न एका व्यक्तीसोबत लावून देण्यात येत असून त्यासाठी तू होकार दे, असे धमकावत तिला त्रास दिला जात होता. मात्र, तरुणी अनोळखी व्यक्तीसोबत लग्न करण्यास तयार नव्हती. त्यामुळे महिला व शाहरुखने तिला मारहाण केली.

लग्नाचा मुहूर्त जवळ आला तरीही तरुणी लग्नास तयार होत नसल्याने अखेर हे लग्न रद्द करण्यात आले. आरोपींच्या तावडीतून तरुणीने सुटका करून घेत थेट पोलिसांत धाव घेत वरील दोघा आरोपींविरोधात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपींना अटक केली.

No comments:

Post a Comment