मांडओहळ धरणाच्या पाण्याने गाठला तळ.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 31, 2023

मांडओहळ धरणाच्या पाण्याने गाठला तळ..

 मांडओहळ धरणाच्या पाण्याने गाठला तळ..


पारनेर -
सलग दोन वर्ष पारनेर तालुक्यात भरपूर प्रमाणात पर्जन्यमान झाले होते तेव्हा या मांडओहळ धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत होते परंतु आता माञ याच धरणाने तळ गाठल्याचे चित्र दिसून येत आहे.आता ७ जून ला मान्सून सूरू होत आहे.तेव्हा जर पाऊस समाधानकारक  झाला तर धरण भरू शकते.पण सध्यातरी या धरणाने तळ गाठला आहे.
या मांडओहळ प्रकल्पाची एकुण साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट तर उपयुक्त साठा ३१० दशलक्ष घनफूट आहे.पळसपुर, नांदूरपठार, सावरगाव परिसरासह मांडओहळ प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधान कारक पाऊस झाल्याने धरण ओहरफ्लो झाले होते. पाणी टंचाईच्या काळात एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत तालुक्यातील गावांना पिण्याचा पाण्या साठी मांडओहळ धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. या काळात तालुक्यांत बहुतांशी गावात पाणी योजनांचे उदभव कोरडे पडतात. त्यामुळें मांडओहळ धरणातून तालुक्यातील गावांना टेंकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो.पाणी टंचाईच्या काळात मांडओहळ धरण तालुका वासियांसाठी वरदान ठरले आहे.
तालुक्यातील उत्तर भागाला वरदान ठरलेल्या मांडओहळ धरणाच्या पाण्याने तळ गाठला आहे. धरणा मधुन कर्जुलेहर्या, टाकळी ढोकेश्वर, कांनहुर पठार, काटाळवेढा, यांसह १८ गावांची पाणी पुरवठा योजना याच धरणातून कार्यान्वित आहे. याना याचा फटका बसत असुन यावर अवलंबून असलेल्या शेतीला पाणी टंचाई च्या झळा सहन कराव्या लागत आहे.
यावर्षी धरणातील पाणीसाठ्यात प्रचंड घट झाल्याने मे महिन्या मध्येच मांडओहळ धरणाच्या पाण्याने तळ गाठला आहे. जून महिन्यात मान्सूनचे आगमन योग्य वेळेत न झाल्यास पारनेरच्या उत्तर भागालाच नव्हे तर तालुक्याला वरदान ठरनारे धरण कोरडेठाक होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. लागोपाठ तीन वर्ष धरण पूर्ण क्षमतेने भरून देखील धरण लाभ क्षत्रातील शेतकऱ्यांना धरण उशाशी व कोरड घशाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाभ क्षेत्रातील पळशी, खडकवाडी, वासुंदे, कर्जुलेहर्या, सावरगाव, काळेवाडी, शिंदेवाडी, कण्हेर वरुडी, गुरवेवाडी, परीसरातील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना प्रशासनाच्या अयोग्य नियोजनाचा फटका बसत आहे.

No comments:

Post a Comment