श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकित हमरातुमरी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 31, 2023

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकित हमरातुमरी.

 श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकित हमरातुमरी.


श्रीगोंदा -
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती अतुल लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली या बैठकीत आदिक वांगणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा ध चा मा झाला. आणि अतुल लोखंडे लक्ष्मण नलगे व दिपक भोसले यांच्यात हमरीतुमरी झाली .
समजलेली अधिक माहिती अशी की व्यापारी मतदारसंघाचे संचालक आदिक वांगणे यांनी  बाजार समितीत व्यापारी हमाल यांना पिण्यास पाणी नाही बोअर बंद पडले आहे  बाजार समितीत अंधाराचे साम्राज्य आहे .
अतुल लोखंडे म्हणाले कि वांगणे व मेहता यांनी हे काम करुन घ्यावे बाजार समिती सर्व व्यवस्था करील त्यावर विरोधी गटाचे संचालक लक्ष्मणराव नलगे यांना वाटले कि सभापती अतुल लोखंडे हे आपल्या संचालकांना तुम्ही पदर कामे करा असे सांगतात हे असे वाटले 
त्यावर नलगे म्हणाले वांगणे तुमचे म्हणणे लोंखडेंना लेखी द्या. त्याशिवाय ते काम करणार नाहीत. त्यावर लोखंडे म्हणाले नलगे तुम्ही कशाला हस्तक्षेप करतात.
त्यावर नलगेंचा पारा चढला ते आमचे संचालक आहेत माझे काम आहे त्यांना मदत करणे लोखंडेंना अपशब्द  त्यावर लोखंडेंही यांनी सभापती पदाची झलक मारली आणि दिपक भोसले म्हणाले नलगे तुम्ही सभापती पदाच्या खुर्चीचा अवमान करु नका आणि या वादावर पडदा पडला  सर्व विषय मंजुर करण्यात आले . अहवाल वाचन सचिव दिलीप डेबरे यांनी केले बैठकीस साजन पाचपुते दत्तात्रय पानसरे वगळता सर्व संचालक उपस्थित होते.
निवडणुकीत दोन्ही गटांनी एकमेकांना लक्ष केले आता संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत गैरसमजूतीतून वादावादी झाली संचालकांनी एकमेकांना समजून घेऊन शेतकरी व संस्था हिताचे निर्णय घेणे महत्वाचे आहे

No comments:

Post a Comment