घरासमोर लावलेल्या कारमधून 13 लाख रुपये चोरणारी टोळी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 31, 2023

घरासमोर लावलेल्या कारमधून 13 लाख रुपये चोरणारी टोळी गजाआड.

 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

घरासमोर लावलेल्या कारमधून 13 लाख रुपये चोरणारी टोळी गजाआड.


अहमदनगर -
बेनवडी, ता. कर्जत येथे घरासमोर लावलेल्या हुंडाई क्रेटा गाडीची काच फोडुन गाडीत ठेवलेली तेरा लाख रोख रक्कम चोरी करणारी आतंरराज्य टोळी स्थानिक गुन्हे शाखेने ने जेरबंद केली आहे.
सदर बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी. अतुल नवनाथ गदादे वय 33, रा. बेनवडी, ता. कर्जत यांनी दिनांक 28 मार्च रोजी त्यांचे घरा समोर लावलेली हुंडाई क्रेटा गाडी क्र. एमएच/42 / बीबी/ 3251 यामध्ये गाडीचे पाठीमागील सिटवर लाल रंगाचे प्लॅस्टीकचे बॅगमध्ये ठेवली तेरा लाख रुपये रोख रक्कम गाडीचे मागील दरवाजाची काच फोडून अनोळखी आरोपींनी चोरून नेली होती. सदर घटेन बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन कर्जत पोलीस स्टेशनमध्ये भादविक 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर चोरीची घटना घडल्यानंतर राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
आहेर, यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सोपान गोरे, सुरेश माळी, देवेंद्र शेलार, रविंद्र कर्डीले, सागर ससाणे, रोहित येमुल, भाऊसाहेब काळे, मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी  पथक तयार करुन सदर चोरीचे गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्याने पथक कर्जत परिसरात फिरुन संशयीत आरोपींची माहिती घेत असताना आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हा आरोपी नामे गोपी शिंडे रा. घन्तावारपल्ली, ता. वेगीपल्ली, जिल्हा चिकबलपुर, राज्य कर्नाटक याने केला असुन तो सध्या त्याचे गांवी घन्तावारपल्ली, राज्य कर्नाटक येथे असुन  अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने  आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कारवाई करणे बाबत आदेश देवुन पथकास लागलीच रवाना केले. पथक बातमीतील नमुद ठिकाणी घन्तावारपल्ली, राज्य कर्नाटक येथे जावून आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती घेतली असता संशयीत इसमा हा टोमॅटो मार्केट येथे असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले.
त्यास  त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव  गोविंद ऊर्फ गोपी रमेश शिंदे वय 25, रा. घन्तावारपल्ली, ता. पल्ली, जिल्हा चिकबलपुर, राज्य कर्नाटक असे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार नामे अंजी कट्टा, रघु अंजी कहा दोन्ही रा. घन्तावारपल्ली, ता. बेगीपल्ली, जिल्हा चिकबलपुर, राज्य कर्नाटक, देवराज कृष्णाअप्पा शिंडे, आलम चेकपोस्ट, गुलबर्गा,राज्य कर्नाटक, कुमार अंजी बलोत, रा. कम्मापाडु, ता. माचाल, जिल्हा गुंटूर, राज्य आंध्रप्रदेश व मल्लम्मा ऊर्फ पद्मा अंजी कट्टा रा. घन्तावारपल्ली, ता. बेगेपल्ली, जिल्हा चिकबलपुर, राज्य कर्नाटक यांनी मिळुन केला असल्याची कबुली दिली.
ताब्यातील आरोपीकडे त्यांचे इतर साथीदारांचे वास्तव्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचे इतर साथीदार सध्या भिगवन, ता. इंदापूर, जिल्हा पुणे येथे पालाच्या झोपडीत राहत असल्याचे सांगितले. पथकाने सदर ठिकाणी जावून खात्री केली असता गोपनिय माहिती मिळाली की, अंजी कट्टा व त्याचे इतर साथीदार हे कर्जत बस स्टॅण्ड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथक कर्जत बसस्टैण्ड परिसरात सापळा लावून थांबलेले असताना एका चहाचे टपरी जवळ आरोपी उभे असलेले दिसले. पथक त्यांना पकडण्याचे तयारीत असताना आरोपींना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते गाडीवर बसुन पळुन जावु लागले. पथकाने पळत जावुन पाठीमागे बसलेल्या आरोपी पकडले व दोन इसम काळे रंगाचे युनिकॉन मोटार सायकलवर बसुन पळुन गेले. ताब्यात घेतलेल्यास इसमास पोलीसांनी त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्यांचे नाव  अंजी अर्जुन बलोत ऊर्फ कट्टा वय 45, रा. घन्तावारपल्ली, ता. वेगेपल्ली, जिल्हा चिकबलपुर, राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपीचे पळून गेलेल्या साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.
ही कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक पुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी करीत आहे.

No comments:

Post a Comment