चोर समजून तिघांना बेदम मारलं, एकाचा मृत्यू.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 28, 2023

चोर समजून तिघांना बेदम मारलं, एकाचा मृत्यू..

 चोर समजून तिघांना बेदम मारलं, एकाचा मृत्यू..


परभणी
 : परभणीमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरुन तीन युवकांना जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर इतर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना परभणी तालुक्यातील उखळद येथे शनिवार २७ मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. तर ही तीन मुले उकळत परिसरामध्ये रानडुक्कर पकडण्यासाठी गेले असल्याचा दावा मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरपानसिंग सुजीतसिंग भौंड असं मयताचे नाव आहे. तर अरुणसिंग जोगींदर सिंग टाक आणि गोरासिंग उर्फ सचिनसिंग गुरुबच्चणसिंग दुधाणी अशी जखमींची नावे आहेत. परभणी जवळील बलसा खुर्द परिसरातील तिघेजण उळखद या ठिकाणी गेले होते. गावातील काही जणांना सदर तिघे चोरी करण्यासाठी आले असल्याचा संशय आल्याने उखळद गावातून नवागडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गावातील काही लोकांनी संबंधितांना जबर मारहाण केली. यामध्ये किरपालसिंग सुजीतसिंग भौंड या युवकाचा मृत्यू झाला तर इतर दोघेजण जखमी झाले.
जखमींना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक रागसुधा आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे ताडकळसचे सपोनि. कपिल शेळके, कर्मचारी लक्ष्मण कांगणे, चाटे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. मयतावर शवविच्छेदन करण्यात आले. गावामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर जिल्हा सामान्य रुग्णालय देखील पोलीस अधीक्षक स्वतः आल्याने रुग्णालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र, या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment