वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, 1 तरुण गंभीर जखमी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 28, 2023

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, 1 तरुण गंभीर जखमी.

 वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, 1 तरुण गंभीर जखमी.


पुणे - अज्ञात वाहनचालकाने दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरात दिलेल्या धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून, त्याचा मित्र गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात लोणीकंद केसनंद रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ घडला.

अथर्व दत्तात्रय गजरे (वय २०, रा. वाघोली ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. ओम लोणकर (वय २१, रा. वाघोली ) असे गंभीर जखमीचे नाव असून त्याने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अथर्व आणि त्याचा मित्र ओम हे साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरुन घरी चालले होते. त्यावेळी लोणीकंद केसनंद रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ अज्ञात वाहन चालकाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे अथर्व आणि ओम खाली पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले. उपचारादम्यान अथर्वचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ओमवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव याबाबत पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment